शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांवरच नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

बापू सोळुंके । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नियम मोडणा-या वाहनचालकांकडून आॅन दी स्पॉट दंड घेणे वाहतूक शाखेने बंद ...

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नियम मोडणा-या वाहनचालकांकडून आॅन दी स्पॉट दंड घेणे वाहतूक शाखेने बंद केले. असे असले तरी नियम मोडणा-यांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देणा-या वाहतूक पोलिसांवर सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे वरिष्ठांनी नजर ठेवणे सुरू केले. जे पोलीस वाहनचालकांशी आर्थिक व्यवहार करताना कॅमे-यात कैद होतील, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर धावणा-या वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचा धोका टळतो. असे असले तरी शहरातील हजारो वाहनचालक रोज वाहतूक नियम मोडून वाहने पळविताना दिसतात. नियम मोडणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी चौका-चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात.सहा महिन्यांपूर्वीपर्यंत शहरातील प्रत्येक वाहतूक पोलिसाकडे दंड आकारणीचे पावती पुस्तक देण्यात आले होते; परंतु वाहतूक पोलिसांनी जागेवर वसूल केलेला दंड शासनाच्या तिजोरीत जमा होतो, अथवा नाही, याबाबत वाहनचालक शंका उपस्थित करीत असे. दंड वसुलीत पारदर्शकता आणण्यासाठी शहर पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडून पावती पुस्तक काढून घेतले आणि त्यांच्या हातात केवळ चलन पुस्तिका दिली. नियम मोडणा-या वाहनचालकांना त्यांनी नियम तोडलेली कलमे नमूद करून त्यांच्या हातात चलन देणे एवढेच काम आता त्यांना देण्यात आले. वाहतूक पोलिसांकडून चलन मिळताच वाहतूक शाखा कार्यालयात जाऊन तेथील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांकडे चलन जमा करून दंड भरणे ही पद्धत सुरू करण्यात आली. असे असताना चौका-चौकात उभे राहणारे वाहतूक पोलीस मात्र वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देतात, अशा तक्रारी वरिष्ठ अधिका-यांना प्राप्त झाल्या.या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी आता सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅ मेºयांची मदत घेण्याचे ठरविले. सूत्रांनी सांगितले की, वाहनचालकांशी रोख रकमेची देवाण-घेवाण करताना एकही कर्मचारी आढळला, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी वाहतूक विभागाने सेफ सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही फुटेजची नियमित पाहणी करण्याचा निर्णय घेतला.