औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे पुन्हा एकत्रीकरण करण्यात येणार असून, सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत. लोकमतने २७ जुलै रोजी अतिक्रमण हटाव पथकाचा पालिकेतच मुक्काम असल्याचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे, सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने सभापती वाघचौरे यांनी प्रभागनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी गठीत करण्यात आलेले पथक रद्द करून एकत्रित जबाबदारी देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रभाग अभियंत्यांवर वॉर्डनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले होते. मात्र, त्यांच्या उपक्रमाला मुजोर कर्मचाऱ्यांनी फाटा दिला. त्यामुळे अतिक्रमणांना अभय देण्याचे प्रकार वाढले. विभाग पोसण्याचा प्रकार...महापालिका अतिक्रमण पथकाला फक्त पोसत आहे. या पथकाची कार्यपूर्ती काय, कोणत्या भागात कारवाई करायची. हे सगळे ठरवून दिलेले असताना इमारत क्र. ३ मध्येच ते पथक ठाण मांडून असते. त्यांच्या मदतीला देण्यात आलेले पोलीस पथकही अलबेल असून, मर्जीनुसार अतिक्रमण विभागाची मोहीम राबविली जाते. त्यामुळेच आदेश आला तरच पथक इमारत क्र. ३ च्या बाहेर पडते. हप्ते वसुलीमध्ये अडकलेला हा विभाग गब्बर होत असून, पालिकेला कंगाल करीत आहे, तर अनधिकृत बांधकामे, हातगाड्यांना अभय देतो आहे. अतिक्रमण पथकांवर रोज ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो.उपायुक्त म्हणाले... अतिक्रमण पथकाचे मनुष्यबळ वाढावे, यासाठी मागणी केलेली आहे. सध्या प्रभागनिहाय पथक गठीत करण्यात आलेले आहे. त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असे उपायुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले.मालमत्ता अधिकारी म्हणाले..वॉर्ड अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याप्रकरणी तातडीने आदेश दिले आहेत. प्रभागनिहाय वाहने, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे मालमत्ता अधिकारी एस. डी. काकडे यांनी सांगितले. ४० पत्रे दिली तरीही कर्मचारी मिळेनाततत्कालीन मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांनी आस्थापना विभागाला कर्मचारी मिळण्यासाठी ४० पत्रे दिली. मात्र, प्रशासनाने कर्मचारी दिले नाहीत. अतिक्रमण हटाव विभाग आणि मालमत्ता विभागाला कर्मचारी नसल्यामुळे शहराचे विदु्रपीकरण वाढले आहे.
पथकावर ठेवणार वॉच
By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST