शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

औरंगाबाद मधील कचऱ्याची स्थिती नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:05 IST

शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये आजही हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कुठे नेऊन टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. जुन्या कचºयाची विल्हेवाट लागण्यापूर्वीच नवीन हजारो मेट्रिक टन कचरा रस्त्यांवरून ओसंडून वाहत आहे.

ठळक मुद्दे४ झोन कार्यालये नापास : दुर्गंधी, धुरामुळे नागरिक आक्रमक

मुजीब देवणीकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये आजही हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कुठे नेऊन टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. जुन्या कचºयाची विल्हेवाट लागण्यापूर्वीच नवीन हजारो मेट्रिक टन कचरा रस्त्यांवरून ओसंडून वाहत आहे. चौकाचौकांत कचºयाला आग लावून देण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. महापालिका, महसूल, शासन नियुक्त अधिकारी अशी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरलेली असतानाही परिस्थिती नियंत्रणात यायला तयार नाही. महापालिकेच्या झोन १ ते ३ आणि ९ मध्ये सर्वात वाईट अवस्था पाहायला मिळत असून, येथील ६० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये कचºयाचे वर्गीकरणच होत नसल्याची बाब समोर आली.शहरातील कचराकोंडीला आज २६ दिवस पूर्ण होत आहेत. आणखी काही दिवस कचराकोंडी फुटण्याची कुठलीच शक्यताही नाही. हजारो मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. अज्ञात स्थळी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात आली, असे चित्र मनपा आणि महसूल विभागाकडून दोन दिवसांपासून निर्माण करण्यात येत आहे. वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी बुधवारी सकाळी मनपा पदाधिकारी व पत्रकारांनीपाहणी दौºयाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, घनकचराप्रमुखविक्रम मांडुरके, शासन नियुक्त अधिकारीउपस्थित होते.मध्यवर्ती जकात नाकासुका कचरा वेगळा करण्यासाठी मध्यवर्ती जकात नाक्यावर एका खाजगी कंपनीच्या मदतीने सेंटर उभारले आहे. येथील परिस्थिती नारेगावपेक्षाही भयानक होऊन बसली आहे. वेगवेगळ्या वॉर्डांचा मिक्स कचरा येथे आणून टाकण्यात येतोय. येथील दुर्गंधी एवढी भयंकर आहे की, नवीन व्यक्तीला उलट्या होतील, अशाही परिस्थितीत मध्यरात्री मनपाचेच कर्मचारी वेगवेगळ्या वॉर्डांमधील कचरा गुपचूप येथे आणून टाकत आहेत. कचºयावर लाखोंच्या संख्येने माशा घोंगावताना दिसून येत आहेत. याच माशा उद्या रोगराईला कारणीभूत ठरणार हे निश्चित. ओला कचरा वॉर्डातच जिरवावा आणि सुका कचरा येथे आणून टाकावा या उद्देशाला मनपा कर्मचाºयांनी हरताळ फासले.रामनगर-मुकुंदवाडीसिडको एन-१, रामनगर, मुकुंदवाडी या भागातील अनेक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून ओल्या कचºयावर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात येते. ऐन कचरा कोंडीत जुना प्रयोग या भागातील नागरिकांना दिलासा देणारा आहे. रामनगर येथे महापालिकेच्या जागेत ओल्या कचºयावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत असल्याचे दिसून आले. महापालिकेचे कर्मचारी नियमितपणे प्रत्येक गल्लीत जाऊन ओला व सुका कचरा जमा करीत होते. कोणत्याच चौकात कचºयाचे डोंगर दिसून आले नाहीत.औरंगपुरा भाजीमंडईशहराच्या कोणत्याही भागात राहणारा व्यक्ती, देशी पर्यटक गुलमंडी, औरंगपुरा भागात अवश्य भेट देतात. भाजीमंडईच्या मुख्य चौकातच कचराच कचरा साचलेला होता. हे दृश्य पाहून मनपा पदाधिकारी जाम भडकले. युद्धपातळीवर कचराकुंडी बाजूला करण्याचे आदेश दिले. साचलेला ओला कचरा वेगळा करून प्रक्रिया केंद्रावर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.शहागंज भाजीमंडईभाजीमंडईत आसपासच्या नागरिकांसह पालेभाज्यांचा ढिगार लागला होता. येथेच शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विविध ओला कचरा टाकण्यात आला होता. यातून अजिबात दुर्गंधी येत नव्हती हे विशेष. हीच पद्धत ठिकठिकाणी राबविण्यात यावी, अशी सूचना शासन नियुक्त अधिकाºयांनी केली.