शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

बीडमध्ये धो-धो पाऊस; रस्त्यावर पाणीच पाणी

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. बीड शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. पाण्यातून रस्ता करताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला पावसाचे वेध लागले होते. अखेर सोमवारी पहाटे वरुणराजाने आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. सोमवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. धो-धो पाऊस पडल्याने अनेकजण पावसाचा आनंद घेताना दिसून येत होते. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या असल्याने रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे या पाण्यातून रस्ता शोधताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. त्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बंद पडत होत्या. बंद पडलेल्या गाड्या ढकलताना वाहनधारकांची दमछाक होताना दिसून आले.शहरातील नगरनाका, शिवाजी चौक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, सुभाष रोड, स्टेडीयम कॉम्प्लेक्स, सहयोनगर, गजानन मंदिर परिसर, माळीवेस, पेठ बीड, आंबेडकर चौक, पंचशील नगर, मित्रनगर आदी भागात रस्त्यावर पाणी आल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली मान्सून पूर्व कामे व्यवस्थित न झाल्याने पाणी रस्त्यावर आले. नाल्यांमधील कचऱ्याला पाणी आडून रस्त्यावर आले होते.पथदिवे बंद असल्याने रस्ता शोधणे झाले अवघडसुभाष रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असताना नागरिकांचे व वाहनधारकांचे हाल होताना दिसून आले. पावसाने आगमन करताच या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या भागात सर्वत्र अंधार पसरला होता. सुभाष रोडवरील साठे चौकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. जास्त पाणी असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने बंद पडली होती. तसेच या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार दिसून आला. हे पथदिवे सुरू करावेत व सुभाष रोड भागातील नाल्या सफाई करण्यात यावी, अशी मागणी सुभाष रोड व्यापारी संघटनेच्या वतीने मंगेश लोळगे यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.अनेकांच्या घरात शिरले पाणीरविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. घरातील पाणी बाहेर काढताना नागरिकांचे हाल होताना दिसून आले. अनेकांनी रात्र जागून काढली. शहरातील नाल्या सफाईची मागणी जोर धरू लागली आहे.