शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोदामपालही वाटेकरी

By admin | Updated: August 10, 2014 23:51 IST

विजय चोरडिया जिंतूर येथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे

विजय चोरडिया जिंतूरयेथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे. दलालाच्या मदतीने क्विंटल मागे दोन किलोच्या फरकाने लाखो रुपयांची कमाई गोदाम रक्षक करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या धान्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावण्यास एक प्रकारे मदतच होत आहे.जिंतूर येथील शासकीय गोदामात होणाऱ्या धान्य घोटाळ्याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील पाच वर्षांपासून गोदामातील धान्य काळ्या बाजारात नेणारे रॅकेट कार्यरत आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुनही त्यातून फारसे तथ्य बाहेर आले नाही. शासकीय गोदामात विविध योजनांचा माल आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट वाहनांचा वापर करण्यात येतो. पुरवठा विभागातून परमीट घेण्यापासून ते गोदामातून माल उचलेपर्यंत दलालांची साखळी कार्यरत आहे. दुकानांचे परमीट दलालच हाती घेऊन एकाच वेळी गोदाम रक्षकाकडे परमीट दिले जाते. त्यानंतर पाहिजे त्या वाहनातून माल भरुन पुंगळा, लिंबाळा या भागात धान्याची इतर पोत्यात पलटी करुन हैदराबादकडे माल पाठविला जातो. ही प्रक्रिया करीत असताना दलालांना कशाचीही भिती वाटत नाही. कारण पुरवठा विभाग व पोलिसांना रसद पुरविल्या जात असल्याने तक्रारीकडेही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे राजरोसपणे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या साखळीला खतपाणी मिळत असल्याचे दिसते.विविध योजनेचे दरमाह ५ हजार क्विंटल धान्य गोदामात येते. त्यातून केवळ ४० ते ५० टक्के धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचते. दरमाह तब्बल अडीच ते तीन हजार क्विंटलचा काळा बाजार केला जातो. दलाल व दुकानदारांचे चांगभलेअन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अडीच हजार क्विंटल धान्य गोदामातून काळ्या बाजारात गेले. गहू दोन रुपये किलो दराने १२०० क्विंटल ज्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये होते. तर तांदुळ १३०० क्विंटल ज्याची किंमत ३ रुपये प्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये होते. हा दोन्ही माल सहा लाख ३० हजार रुपयांचा असताना दुकानदारांना गहू प्रति किलो ९ रुपये दराने तर तांदुळ ८ रुपये दराने दलाल मोबदला देत असल्याने ६ लाख ३० हजारांचे धान्य दुकानदाराकडून दलाल २१ लाख २० हजार रुपयांना खरेदी करतात. हेच धान्य हे दलाल गहू १४ रुपये किलो दराने व तांदुळ १२ रुपये किलोने हैदराबाद येथे विक्री करतात. यातून ३२ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल होत असून केवळ अडीच हजार क्विंटलमध्ये ११ लाख २० हजार रुपये दलालांच्या खिशात जात आहेत. तर १४ लाख ९० हजार रुपये दुकानदारांच्या खिशात जात आहेत.