शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातव की वानखेडे? आज फैसला होणार

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला

हिंगोली : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव यांच्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. सातव विजयी होणार की, खा. सुभाष वानखेडे, याचा फैैसला शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तूळातून वर्तविली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या आतापर्यंत झालेल्या १० निवडणुकांमध्ये काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी ४ वेळा तर राष्टÑवादी व जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेस- शिवसेनेने आतापर्यंत बरोबरी साधल्यानंतर आता पाचव्यांदा कोणता पक्ष विजय मिळवेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. राजीव सातव पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आ. सातव यांच्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ देशभरात लक्षवेधी बनला आहे. दुसर्‍यांदा हिंगोली लोकसभेतून विजय मिळू पाहणारे शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्यासमोर आ. सातव यांनी जोरदार आव्हान निर्माण केले. या निवडणुकीत आ. सातव यांच्या विजयासाठी जसे शिवसेनेतील काही नेत्यांनी प्रयत्न केले, तसे खा. वानखेडे यांच्या विजयासाठी काँग्रेस व राष्टÑवादीच्याही काही नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच अर्थाने चर्चेला आली. आघाडी धर्म व पक्षनिष्ठा बाजूला टाकून वैैयक्तिक द्वेषापोटी निवडणुकीतील उमेदवारांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या नेतेमंडळींसाठीही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात बर्‍याच घडामोडी होणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या निवडणुकीचा परिणाम पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)