शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज क्राइम बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

वाळूज महानगर : घरासमोर लघुशंका करण्याच्या कारणावरुन पती-पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास वडगाव ...

वाळूज महानगर : घरासमोर लघुशंका करण्याच्या कारणावरुन पती-पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथे घडली.

शेख आमेर वजीर (३०) हे सोमवारी रात्री ८ वाजता कुटुंबासोबत घरासमोर गप्पा मारत होते. तेव्हा घराच्या बाजूला लघुशंका करणाऱ्या दोन तरुणांना शेख आमेर यांनी जाब विचारला. त्या तरुणांनी शिवीगाळ करुन शेख आमेर यांना मारहाण केली. आमेर यांच्या पत्नीने मध्यस्थी केली असता तरुणासोबतच्या अन्य दोघांनी पती-पत्नीला मारहाण केली व पळून गेले. या चौघा अनोळखीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------

पिस्टल बाळगणाऱ्यास तीन दिवसाची कोठडी

वाळूज महानगर : वडगाव परिसरात पिस्टल बाळगणाऱ्या कुख्यात आरोपी राजू दहातोंडे यास मंगळवारी (दि.१०) न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राजू दहातोंडे याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी पिस्टलसह अटक केली होती. उपनिरीक्षक सतीश पंडित हे पुढील तपास करीत आहेत.

------------------------

बजाजनगरातून दुचाकी लंपास

वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अवधूत व्यंकटराव मल्हारे (रा.साईनगर) हा ४ नोव्हेंबरला दुचाकीने (क्रमांक एम.एच.२०, ई.बी.९०३८) जाजनगरात बहिणीच्या घरी गेला होता. रात्रीच्यावेळी चोरट्याने दुचाकी चोरुन नेली.

-------------------------

वाळूजला फरार दोघे जेरबंद

वाळूज महानगर : गत पाच वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींना वाळूज पोलिसांनी सोमवारी (दि.९) जेरबंद केले.

आरोपी सुवर्णा उर्फ ईराणी वायरलेस पवार (४२, रा. विजयनगर, वाळूज) व तोजसबाई वासुदेव उर्फ रमेश बहिऱ्या काळे (३८, रा.शिवराई) या दोघा आरोपीविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. खबऱ्याने आरोपींची माहिती पोलिसांना देताच पोलीस पथकाने सापळा रचून या दोघा आरोपींना जेरबंद केले.

---------------------------