शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आरोग्य केंद्र निर्मितीस ‘बजेट’ ची प्रतीक्षा

By admin | Updated: June 11, 2014 00:24 IST

हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यांतर्गत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ९ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी

हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यांतर्गत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ९ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतरही या आरोग्य केंद्रांकरिता अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षभरापासून नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य शासनाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य केंद्र स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला होता. त्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात भानखेडा व ब्रम्हवाडी आणि औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते. तसेच सेनगाव तालुक्यातील जामदया, लिंबाळा तांडा, हिंगोली तालुक्यातील हिंगणी, संतुक पिंपरी, चोरजवळा, दुर्ग सावंगी, बोरी शिकारी, वसमत तालुक्यातील सातेफळ, पळशी या ९ ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. याबाबतचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ रोजी काढला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने नवीन ठिकाणी मंजूर झालेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सिद्धेश्वर वगळता अन्य सर्व ठिकाणी आरोग्य केंद्रांसाठी जागाही उपलब्ध झाल्या. याबाबतची माहिती राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेने सादर केली; परंतु नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. निधीची तरतूद नसल्याने पदनिर्मित्तीही झालेली नाही. त्यामुळे केवळ दिखाऊपणासाठी नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, एकीकडे गतवर्षी मंजूर केलेल्या नवीन आरोग्य केंद्रांकरीता निधीची तरतूद उपलब्ध नसताना राज्य शासनाने ९ जून रोजी काढलेल्या आदेशात पुन्हा राज्यात ३० नवीन आरोग्य उपकेंद्र व १९ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ नवीन ग्रामीण रूग्णालये मंजूर केली आहेत. तसेच २ ग्रामीण रूग्णालयातील ३० खाटांची संख्या वाढून ५० करण्यात आली आहे. तर २ ग्रामीण रूग्णालयाच्या खाटांची संख्या १०० करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकाही आरोग्य केंद्राचा समावेश नाही.त्यामुळे यापूर्वी मंजुरी दिलेल्या नवीन आरोग्य केंद्रांना निधी कधी मिळणार आणि आता नव्याने मंजूरी दिलेल्या आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयांना निधी कधी मिळणार, याकडेच जनतेचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शासनाचा निर्णय प्रलंबितराज्य शासनाने १७ जानेवारी २०१३ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सिद्धेश्वर, भानखेडा, ब्रम्हवाडी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आली होती मंजूरी. जामदया, लिंबाळा तांडा, हिंगणी, संतुक पिंपरी, चोरजवळा, दुर्ग सावंगी, बोरी शिकारी, सातेफळ, पळशी या ९ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्र उभारण्यास देण्यात आली होती मंजुरी.सिद्धेश्वर वगळता अन्य सर्व ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रासाठी जागा मिळाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला केला होता सादर.सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने प्रशासनाची गोची. गतवर्षीच्याच नव्या आरोग्य केंद्रासाठी निधीची तरतूद नसताना पुन्हा राज्य शासनाने काही आरोग्य केंद्रांना दिली मंजुरी.