शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या निधीची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:21 IST

शिवसेना-भाजप युती सरकारने औरंगाबाद शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना-भाजप युती सरकारने औरंगाबाद शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली. महापालिकेनेही मोठा गाजावाजा करीत रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढल्या. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असली तरी शासनाकडून एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदच नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत निधी येण्याची शक्यता कमी आहे. पुढील वर्षी निधी येऊ शकतो. शासनाकडून निधी न आल्यास संपूर्ण रक्कम मनपाला आपल्या तिजोरीतून खर्च करावी लागेल.राज्याची आर्थिक स्थितीही खूप काही चांगली नाही. मागील दीड ते दोन वर्षांपासून महापालिकेकडून सतत रस्त्यांसाठी निधी द्यावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दहा महिने भाजपचामहापौर होता. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानाकडे बराच पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये देण्याचे तत्त्वत: मान्य केले. निधी मिळाल्याचा आनंद भाजपकडून गगनात मावेनासा झाला होता. शहरात मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले. निधी आणल्याचे श्रेय स्थानिक नेते लाटू लागले. १०० कोटींत रस्ते कोणते घ्यावेत या मुद्यावरून जोरदार राजकारण झाले. भाजप महापौरांच्या कार्यकाळातच रस्त्यांच्या कामांचा नारळ फुटावा म्हणून तत्कालीन महापौरांनी जंगजंग पछाडले; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांचा कार्यकाळ संपला तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सोमवारी खंडपीठाने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता निविदा उघडून लवकरच वर्क आॅर्डर देण्यात येईल.आता महापौरपद सेनेकडे आहे. रस्त्यांच्या कामांचे संपूर्ण श्रेय लाटण्यासाठी सेना सज्ज झाली आहे. रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी लवकरच युवा नेते आदित्य ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन व्हावे या दृष्टीने सेनेने व्यूव्हरचना आखली आहे. भाजपच्या अंतर्गत कलहाची किंमत या कामाच्या निमित्ताने चुकवावी लागणार आहे.