शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार कामगार अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

लातूर : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू करून नोंदणीकृत कामगारांना सहाय्य अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत़

लातूर : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू करून नोंदणीकृत कामगारांना सहाय्य अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत़ चालू वर्षात ३१ आॅगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या कामगारांना प्रत्येकी ३ हजाराचे अनुदान देण्याचे काम सुरू केले आहे़ काही कामगारांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले असले तरी ५ हजार कामगार अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत़लातूर जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू केले आहे़ या नोंदणीत १०० दिवसापेक्षा जास्त दिवस रोपवाटीका, वृक्षलागवड ही कामे सोडून बांधकाम, रस्ते, कॅनॉल, बिल्डींग, ट्रान्समिशन टॉवर आदी ठिकाणी काम केलेल्या कामगाराला नोंदणी करून काम उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आले़ तसेच ३१ आॅगस्टअखेरपर्यंत नोंदणी केलेल्या कामगारांना प्रत्येकी तीनहजार रूपयाचे सहाय्यक अनुदान त्या त्या कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे कामही प्रगतीपथावर सुरू करण्यात आले आहे़ ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत नोंदणी केलेल्या ३६०० कामगारांना अनुदान देण्यात आलेले आहे़ तर उर्वरीत पाचहजार कामगारांनाही टप्याटप्याने सहाय्यक अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी हे कामगार अध्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीचे काम दिवसेंदिवस वाढत असले तरी जिल्ह्यातील देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तालुक्यात कामगारांच्या नोंदणीचे काम अत्यल्प आहे़ नोंदणीसाठी मतदानकार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, तीन छायाचित्र व ९० दिवसांच्या कामाचा अनुभव अशी कागदपत्रे लागत असल्याने नोंदी कमी आहेत.५० टक्के कामगारांसाठी व्यक्तिमत्व विकास़़़कामगारांना व्यक्तीमत्व विकास योजनेअंतर्गत एकूण नोंदणी केलेल्या कामगारांच्या पन्नास टक्के कामगारांना व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे़ यामध्ये कामगारांच्या पाल्यांना गोष्टी, जनरल नॉलेज व इतर ज्ञानात भर टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे परंतू उर्वरीत कामगारांना ही पुस्तके कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे़