शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढ्यांना प्रतीक्षा दात्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:19 IST

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे़नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यानंतर चलनटंचाईने नागरिक त्रस्त होते़ आता मात्र रक्ताची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेले दीड महिना शहरात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु होती़ आचारसंहिता सुरु असल्यामुळे राजकीय पक्षांनीही रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित केले नाहीत़ त्यात इतरही सामाजिक संघटनांनी जयंती, पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली नाहीत़ निवडणूक संपताच दिवाळीचा सण आला़ या काळात शाळा-महाविद्यालयांनी सुट्या असतात़ दरवर्षी दिवाळीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवतो़ परंतु यंदा त्यापूर्वी निवडणुका आल्याने रक्तदान शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली़ शासकीय रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी आहे़ या ठिकाणी दररोज नांदेडसह, हिंगोली, परभणी, यवतमाळ शेजारील आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात़ त्यामुळे अपघातातील जखमी, प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातांचाही मोठा समावेश असतो़ शस्त्रक्रियेनंतर यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते़परंतु शासकीय रक्तपेढीतही रक्ताची कमतरता आहे़ रुग्णांच्या नातेवाईकालाच दात्याची व्यवस्था करावी लागत आहे़ रक्तासाठी ऐनवेळी धावपळ करण्याची वेळ येत असल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत़ नातेवाईक किंवा त्याच रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून आणण्यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे़ शासकीय रुग्णालयात दररोज ३० पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांची गरज आहे़ त्यामुळे रुग्णालयाला सातत्याने रक्तदात्यांची प्रतीक्षा असते़ त्याचबरोबर दुसरीकडे शहरात खाजगी रुग्णालयांची संख्याही लक्षणीय आहे़ या रुग्णालयांमध्ये दररोज होणाºया शस्त्रक्रिया व इतर आजारासाठी रुग्णांना रक्त लागते़ परंतु सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़