शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्कआॅर्डर देऊनही कोट्यवधींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:30 IST

शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सध्याचे पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने १२० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराला कार्यारंभ (वर्कआॅर्डर) आदेश दिल्यानंतरही पथदिव्यांच्या कामावर मनपाच्या तिजोरीतून खर्च होतो आहे.पालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे करून उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. सभापती गजानन बारवाल यांनी १२० कोटींच्या निविदेत कोणकोणत्या कामांचा समावेश आहे, याचा अभ्यास करून बैठकीत माहिती देण्याच्या सूचना अधिका-यांनी केल्या.बैठकीत एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा प्रारंभ केव्हा होणार आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम सुरू करण्यास विलंब का करण्यात येत आहे. याचा खुलासा करण्याची मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. निविदेतील तरतुदीनुसार स्क्रो खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्यानुसार लेखा विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी दिली. त्यावर मुख्य लेखाधिकारी आर. एम. सोळुंके यांनीदेखील याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.१२० कोटींची कामे शहरात होणार असतील तर वॉर्डांतर्गत निविदा काढून विद्युत विभाग कोट्यवधी रुपयांची कामे का करीत आहे. ही उधळपट्टी बंद करण्यात यावी, अशी मागणी वैद्य यांनी केली.