नांदेड : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उपअभियंता वहाबोद्दीन फारूखी यांच्या कार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेल्या काळातील कामांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे यांनी दिली़ २२ मे २०१४ ते ३० मे २०१४ या कार्यकाळात उपअभियंता वहाबोद्दीन फारूख यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता़ त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामकाजात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ १३ जून २०१४ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वहाबोद्दीन फारूखी यांच्या काळात झालेल्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली़ त्याच्या काळात झालेल्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी आदेश दिल्याचे तायडे यांनी सांगितले़ त्यांच्या काळातील २३ कामाच्या ७५ लाख २९ हजार २१३ रूपयाच्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे़ यात मुदखेड येथील प्रजिमा १० ते इजळी रस्त्याची सुधारणा करणे या कामासाठी गट ब या लेखाशिर्षातून ६ लाख ५७ हजार ३१० रूपयाचे काम, नांदेड तालुक्यातील प्ररामा ते जोडरस्ता वांगी रस्त्याची सुधारणांसाठी ६ लाख ९८ हजार ५०२ रूपये, वडगाव येथील आरोग्य विगातंर्गत सिमेंट रस्ता ९ लाख २३ हजार ९५५ रूपये, पावडेवाडी जोडरस्ता ११ लाख १४ हजार, सेस फंडातून यशवंतराव चव्हाण वातानुकूलित यंत्र बसविण्यासाठी १ लाख ७१ हजार, किरकोळ खर्च ४६ हजार, किनवट तालुक्यात मौजे पोटरेडी आरोग्य उपकेंद्रात सिमेंट रस्ता बांधकामासाठी १ लाख ५३ हजार ९८२ रूपये़ गोकुंदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना दुरूस्ती १ लाख ४६ हजार ४८२, बेंदी तांडा येथील सिमेंट रस्ता बांधकामासाठी २ लाख ७० हजार ५२२, धानोरा तांडा येथील समाज मंदिर बांधकामासाठी २ लाख ८२ हजार ८२०, येंदा येथील सिमेंट रस्ता बांधकाम २ लाख २२ हजार २ रूपये, अंबाडी येथील आरोग्य विभाग लेखाशिर्षातून संरक्षण भिंत बांधण्यासाठी १ लाख ४९ हजार ८६७ रूपये, सलाई गुडा येथील आरोग्य उप केंद्र दुरूस्ती ३ लाख ९४ हजार ४९४ रूपये, आमदार निधीतून कुपटी येथील सभामंडप बांधकामासाठी १ लाख ५० हजार तसेच आरोग्य विभागांतर्गत निचपूर येथील सिमेंट रस्ता बांधकाम ११ हजार, राजगड येथील सिमेंट रस्ता बांधकाम १९ हजार, अंबाडी येथील सिमेंट रस्ता बांधकाम २ लाख १५ हजार रूपयाचे बांधकाम़ हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथे आमदार निधीतून सांस्कृतिक सभागृह बांधकाम ८ लाख ५८ हजार २४२ रूपये तर हिमायतनगर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना कामारी येथील संरक्षण भिंत बांधकामासाठी ३ लाख ९७ हजार ४४५ रूपये अशा एकूण ७५ लाख २९ हजार २१३ रूपयांच्या बांधकामाविषयी चौकशी होईल़ (प्रतिनिधी)
वहाब यांच्या कार्यकाळातील कामाच्या चौकशीचे आदेश
By admin | Updated: June 23, 2014 00:01 IST