शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी तालुका दोन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: June 11, 2014 00:25 IST

वडवणी: शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वडवणी: शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळातच वडवणी तालुक्याला वीजपुरवठा करणारे मुख्य खांब पडल्याने महावितरणच्या गलथान कारभारामुळे तब्बल दोन दिवस संपूर्ण वडवणी तालुका अंधारात होता. मंगळवारी दुपारपर्यंतही याचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र गारांचा मारा झाला. तर मागील आठवड्यापासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. या पावसामध्ये लिंबोणी, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, उन्हाळी बाजरी, मका या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर अगोदरच आभाळाएवढे दु:ख कोसळले असताना वडवणी तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार मागील दोन महिन्यांपासून सुरुच आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात महावितरणच्या वीजपुरवठा करणारे मुख्य खांब पडल्याने शुक्रवारी चार वाजल्यापासून तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वडवणी तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले असून, विजेअभावी अनेक कामे खोळंबली आहेत.तालुक्यात एक सबस्टेशन असून, या सबस्टेशनवर एकूण ३६ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील मोरवडजवळील दत्त मंदिराजवळ वीजपुरवठा करणारा मुख्य खांब या वादळी वाऱ्यात पडला. तब्बल २० तास उलटूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आलेले नाही. यावरुन वडवणी तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार कशाप्रकारे चालतो? हे स्पष्ट दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांमधून केला जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.याबाबत वडवणीचे शाखा अभियंता आशिष धारणे म्हणाले, आमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. (वार्ताहर)तब्बल २० तास उलटूनही महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयशवीज पुरवठा करणारा मुख्य खांब पडल्याने वीजपुरवठा खंडिततालुक्यातील ३६ गावे शुक्रवारी चार वाजेपासून अंधारातचमहावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरवादळी वाऱ्याचा संपूर्ण वडवणी तालुक्याला फटका