शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाची शाळा भरलीऽऽ

By admin | Updated: July 10, 2014 01:02 IST

लातूर : हाती तुळशीची माळ, कपाळावर उभा गंध अन् बुक्का आणि मुखातून होणारा विठुरायाचा जयघोष यामुळे बुधवारी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय झाला होता़

लातूर : हाती तुळशीची माळ, कपाळावर उभा गंध अन् बुक्का आणि मुखातून होणारा विठुरायाचा जयघोष यामुळे बुधवारी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय झाला होता़ रिमझिम पावसातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या़ शिवाय, शहरातील विविध शाळा, नर्सरींतील विद्यार्थ्यांनी संत-महात्म्यांची वेशभूषा परिधान करून देखाव्यांसह मुख्य रस्त्यांवरून पालखीसह चित्तवेधक मिरवणुका काढल्या होत्या. दरम्यान, प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडू तात्यांच्या समाधीचे, वांजरवाड्यातील संत गोविंद माऊलींचे तसेच देवणीतील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती़पंढरपूरच्या विठ्ठल हा गरिबांचा देव आहे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची धारणा असल्याने आषाढी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंढरपूरला धाव असते़ काही भाविक आपल्या शहरातील, परिसरातील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेऊन समाधान मानतात़ बुधवारी सकाळपासूनच शहरातील गंजगोलाई परिसरातील विठ्ठल- रुक्मिणी परिसरात आबालवृध्दांनी दर्शनासाठी रांग लावली होती़ विठ्ठल- विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीची मनोभावे दिवसभर पूजा करुन दर्शन घेत होते़ मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते़ गेल्या महिनाभरापासून वरुणराजाने हुलकावणी दिल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाला दोन दिवसांपासून बरसात करुन वरुणराजाने दिलासा दिला आहे़ त्यामुळे भाविकांत आनंद ओसंडून वाहत होता़ शहरात दिवसभर पावसाच्या सरी सुरु होत्या़ अशा पावसातही भाविकांनी दर्शनासाठी, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी गर्दी केली होती़ मंदिर परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती़ बुधवारी शाळेस सुट्टी असल्याने बालकांसह ज्येष्ठ मंडळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांत तल्लीन झाल्याचे दिसून येत होते़ संत गोविंद माऊलींच्या दर्शनासाठी गर्दीवांजरवाडा : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील श्री संत गोविंद माऊली, विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांनी गर्दी केली होती़ दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लागली होती़ वडगाव, सोरगा, दापका, जांब बु़, धामणगाव, केकतसिंदगी, उमरदरा, उमरगा रेतू या गावांतील दिंड्या वांजरवाडा येथे बुधवारी दाखल झाल्या होत्या़ गावकऱ्यांच्या वतीने पहाटे महापूजा करण्यात आली़ त्यानंतर भाविकांना पूजा करुन दर्शन घेत होते़ नेत्रसुखद पालखी सोहळा देवणी : बुधवारी देवणीतील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेला होता़ देवनदीवरील या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या़ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिरापासून नगर प्रदक्षिणा व पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला़ खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ- मृदंग घेऊन भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते़ दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले़ हत्तीबेट, लोणी माळरानावर रीघउदगीर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसेच हत्तीबेट व लोणी येथील माळरानावरील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती़ शहरातील दुधिया हनुमान मंदिर, विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.शाळांचीही दिंडी़़़आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांच्या वतीने दिंडी काढण्यात आली़ छोट्या बालकांनी कपाळी उभा गंध, त्यामध्ये बुक्का, दोन्ही कान व गालास पांढरा गंध लावून दिंडीत सहभाग घेतला होता़ काही चिमुकल्यांच्या हाती टाळ, चिपळ्या तर काहींच्या हाती वीणा तर काहींच्या हाती मृदंग होते़ टाळ, मृदंग, चिपळ्या आणि वीणेच्या गजरात वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेली बालके विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत होते़ सकाळपासूनच विद्यार्थ्यांची ही लगबग सुरु असल्याचे पहावयास मिळाले़