शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

विठू विठू नामाचा जयघोष..!

By admin | Updated: July 16, 2016 01:09 IST

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला.

जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता. भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिम समाजाची २८ वर्षांची परंपराएकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.नामाचा जयघोष..!जालना : विठ्ठला... पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल, जयहरी.., माऊली, माऊली... भज गोविंदम, भज गोपाला... यासारखा जयघोष शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये ऐकावयास मिळाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवसभर लाखो भाविकांनी शिस्तबद्ध आणि रांगेतून शांततेत दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे शुक्रवारच्या दिवशी जालना शहरात अवघी पंढरीच अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी अपूर्व उत्साहात पार पडली. शहरातील जुना जालन्यात असणाऱ्या आनंदीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरती झाल्यानंतर सकाळी आनंदीस्वामी यांची पालखी मंदिरापासून निघाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला होता. भाळी अष्टगंध, गळ्यात टाळ, मृदंग, डोक्यावर विठ्ठल, विठ्ठल नाव लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रूमाल, झेंडे, पताके लेझिम, बँड पथक, हालगी पथक, दांडपट्टा यामुळे पालखी मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आनंदीस्वामी मंदिरापासून निघालेली ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदीस्वामी मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुस्लिम समाजाची २८ वर्षांची परंपराएकतेचा संदेश : पालखीचे स्वागत, वारकऱ्यांचा सत्कार जालना : हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई... हम सभ है भाई भाई... या ओळींचा प्रत्यय शुक्रवारी जालना शहरातील जामा मस्जीदसमोर आला. मुस्लीम समाज बांधवांकडून आनंदीस्वामींच्या पालखीचे स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. २८ वर्षांची परंपरा आजही कायम असून यातून एकतेचा संदेश देण्यात येतो.‘भज गोविंदम भज गोपाला...’ असा जयघोष करीत आनंदीस्वामींची पालखी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जामा मस्जीदसमोर आली. येथे मुस्लीम समाजाच्यावतीने स्वागत करण्याची २८ वर्षांपासूनची परंपरा आहे. शुक्रवारीही समाजाच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, सोहेल खान, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पवार, शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी, शेख मेहमूद, शेख अख्तर अहेमद यांची प्रमुख उपस्थित होते. स्वागत, सत्कार कार्यक्रमानंतर ही पालखी गांधी चमन परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. सय्यद जावेद अली, जब्बार खान, शेख जावेद, शेख निजाम, शेख जब्बार, शेख जमील, अमजद खान, लईक शेख, शेख अजहर, शफी अहेमद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.आषाढी एकादशिनिमित्त जालना विभागातून १२० जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी रात्री बसस्थानकांत भाविक प्रवाशांची गर्दी होती. त्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी विभागीय नियंत्रक पी.पी.भुसारी, सांख्यिकी अधिकारी कवसाडीकर, आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे, कर्मवर्ग अधिकारी घोडके, उपयंत्र अभियंता गोविंद कबाडे, विभागीय वाहतूक अधिकारी चोथमल हे जालना स्थानकात शुक्रवारी सकाळपासून ठाण मांडून होते. तसेच स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही.पालखी मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळाची व चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठल मंदिर रोडवरील माळीपुरा भागात चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संजय तिडके, गणेश दुरे, मंगेश कराळे, जालिंदर वायाळ, विनोद डोरे, शिवाजी देशमुख, एकनाथ मोटे, दत्ता जगदाने आदींनी सहभाग नोंदवला. १२ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. तसेच कसबा परिसरात १० क्विंटर शाबुदान्याचे वडे भाविकांना देण्यात आले. यासह अनेक ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती.