शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजन असलेले नेतृत्व आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:29 IST

श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर आतापर्यंत क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच अधिक झाले़ मात्र हे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे़ तत्कालीन नेतृत्वाने दूरदृष्टी ठेवून या स्टेडियमची उभारणी केली होती़ दूरदृष्टी, व्हिजन असलेले नेतृत्व शहराला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा सोमवारी माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी़श्रीकांत, महापौर शैलजा स्वामी, आ़अमरनाथ राजूरकर, आयुक्त गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती़ खा़चव्हाण यांनी या मैदानाच्या कामाबाबत आनंद व्यक्त करताना टर्फ विकेट असलेले मराठवाड्यातील हे पहिले मैदान आहे़ या मैदानावर आता क्रिकेट सामने होणे आवश्यक आहे़ आतापर्यंत या मैदानावर क्रिकेटऐवजी राजकीय सामनेच जास्त झाले आहेत़ मात्र यापुढे क्रिकेटचे सामने जास्त व्हावेत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या़ १९७७ मध्ये तत्कालीन नगर परिषदेच्या वतीने या स्टेडियमच्या कामाला सुरुवात केली होती़ त्यानंतर या मैदानाचा मागील २५ वर्षांत चांगला विकास झाला आहे़ दूरदृष्टी ठेवून या मैदानाची स्थापना केली होती़ अशीच दूरदृष्टी शहराच्या विकासासाठीही आवश्यक आहे़ असेही ते म्हणाले़या मैदानावर आता आयपीएल, रणजी तसेच आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतील़ मात्र याची सुरुवात मराठवाडा प्रीमिअर लीगच्या माध्यमातून व्हावी, असेही ते म्हणाले़महापौर शैलजा स्वामी यांनी नांदेड नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हे मैदान उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले़ त्याचवेळी या मैदानावर महिलांचे क्रिकेट सामने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली़ आ़ राजूरकर यांनी काँग्रेसने मागील निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील काम पूर्ण झाल्याचे सांगितले़ प्रास्ताविकात आयुक्त गणेश देशमुख यांनी मैदानाच्या उभारणीतील टप्प्याबाबत माहिती दिली़ यात स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे विकास झाल्यानंतर येथे रणजी ट्रॉफी, आयपीएल तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतील़ मैदानाचा विकास करण्यासाठी दोन कोटींचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली़ पव्हेलियन नूतनीकरण आणि नवीन बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले़