शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘माझा विठ्ठल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:43 IST

कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठ्ठल, चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला वारक-यांचा विठुराय, अशी विठ्ठलाची विविध रूपे बालकांनी मोठ्या सर्जनशीलतेने कागदावर चितारली आणि ‘स्टार प्रवाह’ व ‘लोकमत’ यांच्यातर्फे आयोजित ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठ्ठल, चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला वारक-यांचा विठुराय, अशी विठ्ठलाची विविध रूपे बालकांनी मोठ्या सर्जनशीलतेने कागदावर चितारली आणि ‘स्टार प्रवाह’ व ‘लोकमत’ यांच्यातर्फे आयोजित ‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.स्पर्धेदरम्यान शहरातील हजारो शाळकरी विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून विठू माऊलीचे रूप कॅनव्हासवर उतरत गेले. दि. ३० आॅक्टोबर रोजी स्टार प्रवाहवर सायंकाळी ७ वा. ‘विठू माऊली’ मालिकेच्या पहिल्या भागात विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत आणि पारितोषिक प्राप्त चित्रेही दाखविली जाणार आहेत.स्टार प्रवाहवर दि. ३० आॅक्टोबरपासून दररोज सायं. ७ वा. विठू माऊली ही नवी मालिका दाखल होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या अवताराची कहाणी या मालिकेत पाहायला मिळेल. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ही मालिका अतिशय भव्यदिव्य आणि नेत्रदीपक आहे. या मालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात मोठी उत्सुकता असून मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या १२ शहरांतील प्रत्येकी १२ शाळांमध्ये म्हणजेच एकूण १४४ शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मनातल्या विठ्ठलाला कॅनव्हासवर चितारले. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चित्र वेगळे आणि अनोखे आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. ‘माझा विठ्ठल’ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड असून, प्रत्येक विद्यार्थ्याचे चित्र खास आहे. त्यामुळे एक लाखाहून अधिक चित्रांतून विजेते निवडणे मोठे आव्हान होते, असे परीक्षकांनी सांगितले.‘माझा विठ्ठल’ या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन दि. २९ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे स. १० ते रात्री ८ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रत्यक्ष पाहता येतील. तेव्हा या प्रदर्शनालाही आवर्जून भेट द्या आणि दि. ३० आॅक्टोबर रोजी स्टार प्रवाहवर सायं. ७ वा. स्पर्धेतील विजेते आणि ‘विठू माऊली’ ही मालिका पाहायला विसरू नका.