शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

विराट बहुजन क्रांती...

By admin | Updated: January 17, 2017 22:55 IST

उस्मानाबाद : ‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़़’ ही संकल्पना महामोर्चाच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी प्रत्यक्षात साकारली.

उस्मानाबाद : ‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़़’ ही संकल्पना महामोर्चाच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी प्रत्यक्षात साकारली. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजातील पन्नासपेक्षा अधिक जाती, जमातींच्या महिला-नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढला़ मोर्चात बहुजनांचा अभूतपूर्व सहभाग असतानाही मोर्चाच्या प्रारंभीपासून शेवटपर्यंत शिस्तीचे मोठे दर्शन मोर्चेकऱ्यांनी घडविले़‘नवे पर्व़़़ बहुजन सर्व़़’चा नारा देत मागील एक- दीड महिन्यांपासून बहुजन मूक महामोर्चा काढण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने गावा-गावात बैठका घेण्यात आल्या होत्या़ बहुजन समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष-संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन केले होते़ या नियोजनानुसार मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून शहरातील लेडिज क्लब मैदानाच्या मार्गावर नागरिकांची गर्दी दिसत होती़ कुणाच्या हाती निळा झेंडा तर कुणाच्या हाती पिवळा तर कोणाच्या हाती लाल अन् गुलाबी झेंडा होता़ झेंडे खांद्यावर घेवून युवक-युवतीसह जेष्ठ लेडिज क्लबच्या दिशेने कूच करीत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या मैदानावर मोठी गर्दी होण्यास सुरूवात झाली़ गैरसोय टाळण्यासाठी महिलांना लेडीज क्लबच्या मैदानात थांबविण्यात आले. तर युवकांसह नागरिकांचा मोठा जनसमुदाय मुख्य मार्गावर एकवटला होता. गर्दी वाढल्यानंतर हा जथ्था पुढे जिजाऊ चौकाच्या दिशेने सोडण्यात आला़ यावेळी लेडिज क्लब ते जिजाऊ चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू गर्दीने फुलून गेल्या होत्या. मोर्चेकऱ्यांच्या हाती मागण्यांचे विविध फलक होते़ काही युवकांनी जवळपास ११० फूट लांबीपर्यंतचे दोन निळे झेंडे तयार करून त्या झेंड्यासह मोर्चात सहभाग नोंदविला होता़ हे झेंडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते़ लेडिज क्लबस्थळी येणाऱ्या महिला- मुलींसह ज्येष्ठांना आवश्यक ती मदत स्वयंसेवकांकडून पुरविली जात होती. तसेच आवश्यक त्या सूचनाही दिल्या जात असल्याचे दिसून आले़शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गासह बार्शी, वैराग, तुळजापूर, येडशी मार्गासह औसा मार्गावरूनही बहुजन समाजातील नागरिक उस्मानाबादेत दाखल झाले़ दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या प्रारंभी शिष्टमंडळातील पदाधिकारी होते़ त्यानंतर युवती-महिला तर त्यांच्या मागे युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता़ संत गाडगे महाराज चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आला़ तेथून पुढे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले़ तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध जाती-जमातींचा प्रत्येकी एक पदाधिकारी या प्रमाणे शिष्टमंडळ तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला़ जवळपास ५० हून अधिक जाती-जमातीतील लोकांना एकत्रित आणीत बहुजनांचा हा मूक महामोर्चा आयोजकांनी यशस्वी केला़