शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाच्या उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने उद्या, रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा आयोजित केली होती. ...

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने उद्या, रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी शुक्रवारी परीक्षा स्थगित झाल्याचा निरोप आला आणि प्रशासनाच्या उत्साहावर विरजण पडले. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आल्याचा निरोप जिल्हा प्रशासनाला सायंकाळी सहा वाजता मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी जिल्हा प्रशासनाला ई-मेल संदेशाद्वारे कळविले की, ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, या परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली संवेदनशील, गोपनीय सामग्री, कोविड किट, हजेरीपट, स्टिकर्स व इतर लेखनसामग्री या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कस्टडीत सुरक्षित ठेवण्यात यावी.

तत्पूर्वी, दोन दिवसांवर आलेल्या या परीक्षेची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. या परीक्षेसाठी लागणारे मनुष्यबळ, परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचे पाऊच, ऑक्सीमीटर, तापमान मोजण्याचे यंत्र तसेच हे साहित्य केंद्रनिहाय पोहोच करण्यासाठी वाहनांचे नियोजन केले जात होते.

परीक्षेसाठी औरंगाबादेत १९ हजार ६६३ उमेदवारांनी नोंदणी केली असून, ६० केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १६५० कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना त्यासंबंधितांना त्याबाबतचे पत्रही पाठविण्यात आले आहे. एका कक्षात २४ विद्यार्थी याप्रमाणे १२०० कक्षांमध्ये ही परीक्षा घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली होती. मात्र राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे आरोग्य तसेच सरकारी यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत उद्या, रविवारची ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला.