शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बिबट्याच्या जोडीने घेरलेल्या शेतकºयाची ग्रामस्थांकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:03 IST

सोयगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याने पसार केलेल्या कवली येथील शेतक-याचा सहाव्या दिवशीही शोध लागलेला नसताना पुन्हा मंगळवारी सायंकाळी याच कवली शिवारात बिबट्याच्या जोडीने चक्क एका शेतक-याला फडशा पाडण्याच्या उद्देशाने घेरले, परंतु या शेतक-याने समयसूचकता दाखवून मोबाईलवरुन ग्रामस्थांना माहिती दिल्याने गावकरी धावले आणि हा शेतकरी बचावला.

लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव : सोयगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याने पसार केलेल्या कवली येथील शेतक-याचा सहाव्या दिवशीही शोध लागलेला नसताना पुन्हा मंगळवारी सायंकाळी याच कवली शिवारात बिबट्याच्या जोडीने चक्क एका शेतक-याला फडशा पाडण्याच्या उद्देशाने घेरले, परंतु या शेतक-याने समयसूचकता दाखवून मोबाईलवरुन ग्रामस्थांना माहिती दिल्याने गावकरी धावले आणि हा शेतकरी बचावला. बिबट्यांच्या या थरारनाट्याने तालुक्यात अजून दहशत पसरली आहे.कवली फाट्यावर असलेल्या शेतात नबाब अकबरखान पठाण (४८) हे शेतकरी मंगळवारी सायंकाळी शेतातून घराकडे येत होते. वाटेत अचानक बिबट्याच्या जोडीने त्यांना फडशा पाडण्याच्या उद्देशाने तासभर शेतातच रोखून धरले. यामुळे पठाण यांना शेताबाहेर निघणे मुश्कील झाले. त्यांनी शेतातूनच मोबाईलवरून कवली गावातील नागरिकांना वाचविण्यासाठी विनंती केली. कवली गावातून पन्नासच्यावर ग्रामस्थांनी लगेच हातात लाठ्याकाठ्या घेऊन शेत गाठले व बिबट्याच्या जोडीला शेतातून हुसकावून लावले. दरम्यान, बिबट्याची जोडी मुर्डेश्वर शिवाराकडे गेली. या शेतकºयाचा जीव वाचविण्यासाठी रवींद्र तराळ, बाजीराव केंडे, गजानन हलनोर, अनिल वानखेडे, शिवाजी अहिर, किशोर केंडे, अमोल पंडित, योगेश ढमाले, दगडू तडवी, मयूर बनकर, गौरव पाटील आदींसह गावकरी व शेतकºयांनी परिश्रम घेतले. आपला प्राण वाचविल्याबद्दल पठाण यांनी या सर्वांचे आभार मानले.कवली शिवारात मुक्त संचार सुरुचसोमवारी रात्रीही कवली शिवारातील गट क्रमांक ७५मध्ये या जोडीने तीन रानडुकरांचा फडशा पाडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. याबाबत शेतकरी प्रदीप बडगुजर यांनी वनविभागाला कळविले आहे. बहुलखेडा शिवारातही मंगळवारी रामाजी पवार यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. युवराज पाटील, दिलीप पाटील आणि भगवान लक्ष्मण पाटील यांच्या शेतातही भरदिवसा या जोडीने मंगळवारी मुक्तसंचार केल्याने शेतमजूर भयभीत झाले आहेत. जि.प. सदस्या पुष्पा काळे, भाजपचे सुनील गव्हांडे आदींनी कवली गावात तातडीने भेट देऊन भेदरलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.फर्दापूर परिसरातही बिबट्याची दहशत कायमफर्दापूर : गेल्या महिनाभरापासून एकापाठोपाठ एका पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणारा बिबट्या आता गावाजवळील शेतांवर आला आहे. सोमवारी रात्री हुसेनखाँ अब्बासखाँ यांच्या शेतातील हेल्याचा या बिबट्याने फडशा पाडल्याने या भागात दहशत वाढली आहे. यात या शेतकºयाचे बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्याशेजारील शेतकरी हारूणखा नजीरखा यांना मंगळवारी हाच बिबट्या दिसल्याने त्यांनी घाबरुन पळ काढला. शेतात कापूस वेचण्यासाठी जाणाºया महिलांमध्ये दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.