शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

नांदेड: नागपूर-नांदेड-तुळजापूर या रस्त्याचे काम करण्यात आले़ परंतु या ठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी मात्र गेल्या एक वर्षापासून करण्यात आली नाही़

नांदेड: नागपूर-नांदेड-तुळजापूर या रस्त्याचे काम करण्यात आले़ परंतु या ठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी मात्र गेल्या एक वर्षापासून करण्यात आली नाही़ त्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने नागरिकांनी केक कापून रस्त्याचा वाढदिवस साजरा केला़जिल्ह्यात बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच पहावयास मिळते़ प्रशासनाकडून दरवर्षी हे खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदाही काढण्यात येतात़ कंत्राटदाराकडून खड्डेही बुजविण्यात येतात़ परंतु काही दिवसातच खड्डे पुन्हा उघडे पडतात़ अशापद्धतीने खड्डयासाठी आलेला निधी खड्डयात घालण्याचा बिनबोभाट कारभार सध्या जिल्ह्यात सुरु आहे़ या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ परंतु त्याबाबत गांभीर्याने कुणीही विचार करीत नाही़ अशाचप्रकारे नागपूर-नांदेड-तुळजापूर या महामार्गाचे काम करण्यात आले़ परंतु त्यावर आता मोठ-मोठे खड्डे पहावयास मिळतात़ गेल्या एक वर्षापासून या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही़ त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार, शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यातच केक कापून शासनाचा निषेधही नोंदविला़ ग्रामस्थांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे मात्र या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती़ यावेळी गंगाधर कवाले पाटील, दौलतराव सावंत, शिवराज पाटील घोरपडे, गोविंद शिंदे, प्रभाकर गायकवाड, रावसाहेब शिंदे, धनंजय जाधव, शरद भालके, राम पाटील शिंदे, माधव देशमुख, गणेश कवाले, लक्ष्मण कवाले आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)नागपूर-नांदेड-तुळजापूर रस्त्यावर खड्डेच खड्डेखड्ड्यांना झाले एक वर्ष