शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

सप्टेंबरमध्ये गावपुढाऱ्यांच्या निवडी

By admin | Updated: August 27, 2015 00:01 IST

कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे.

कळंब : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा गुलाल निघतो न निघतो तोच आता सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला आहे. तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतच्या ‘कारभाऱ्याची’ आगामी १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत निवड करण्यात येणार आहे. यासाठी आतापासूनच काही गावात ‘लॉबींग’ सुरु झाल्या आहेत.कळंब तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीपैकी ५७ ग्रामपंचायतची ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली होती. ६ आॅगस्टला मतमोजणी होवून निकाल घोषीत करण्यात आला होता. येरमाळा, मंगरुळ यासारख्या मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतचा या टप्प्यात समावेश असल्याने अनेक गावात बहुरंगी लढती झाल्या होत्या. ५७ ग्रामपंचायतच्या १८२ प्रभागातील ४८१ सदस्यासाठी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील ८५, अनुसूचित जमातीमधील २, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून १२५ तर सर्वसाधारण प्रवर्गातून २६७ सदस्य निवडले गेले होते. विजयी जल्लोषासाठी व पराभवाची कारणे शोधणारी मने स्थिरावतात न स्थिरावतात तोच आता अपेक्षित असा सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरला भाटशिरपुरा, आडसूळवाडी, आढळा, वाणेवाडी, वडगाव (शि), बारातेवाडी, रायगव्हाण, देवधानोरा, भाटसांगवी, घारगाव ग्रा.पं. च्या १४ सप्टेंबरला ताडगाव, रांजणी, ईटकूर, शिंगोली, चोराखळी, येरमाळा, उमरा, परतापूर, वाकडी (इ), १७ सप्टेंबरला हावरगाव, पाथर्डी, पिंपळगाव (डो), भोगजी, हळदगाव, भोसा, मलकापूर, पानगाव, देवळाली, दूधाळवाडी, लासरा, एकुरका, १८ सप्टेंबर रोजी सापनाई, जायफळ, २१ रोजी कन्हेरवाडी, आथर्डी, मंगरुळ, बहुला, दहिफळ, शेलगाव (दि), उपळाई, बांगरवाडी, माळकरंजा, पाडोळी, गंभीरवाडी, २२ रोजी बरमाचीवाड, पिंप्री (शि), २३ रोजी नायगाव, बोरगाव (ध), २५ रोजी खोंदला, सौंदणा ढोकी व २६ रोजी वडगाव (ज) येथील सरपंचाच्या निवडी होणार आहेत. (वार्ताहर)सरपंच निवडीचा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालणार असून, प्रत्येक ग्रा.पं. साठी स्वतंत्र अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ५७ ग्रा.पं. पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रर्गासाठी १० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ ग्रा.पं. चे सरपंचपद आरक्षित झाले आहेत. यातील पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत. यापैकी ईटकूर, येरमाळा या मोठ्या ग्रा.पं. सर्वसाधारणासाठी तर मंगरुळ, नायगाव, रांजणी, दहिफळ, कन्हेरवाडी, पाडोळी, चोराखळी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.