शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियान कागदोपत्रीच

By admin | Updated: August 9, 2014 00:24 IST

बी.डी.सवडे, अकोलादेव जाफराबाद तालुक्यातील ग्रामस्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असून, केवळ कागदोपत्रीच हे अभियान राबविले जात आहे. आजही ग्रामीण भागातील

बी.डी.सवडे, अकोलादेवजाफराबाद तालुक्यातील ग्रामस्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असून, केवळ कागदोपत्रीच हे अभियान राबविले जात आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये लोक उघड्यावरच शौचास बसताना दिसत आहेत.ग्रामपंचायतस्तरावर सरपंच व ग्रामसेवक मंडळी स्वच्छता अभियानाचा खोटा आव आणून बक्षीसपात्र गावाचे अनुदान लाटण्यासाठी एक प्रकारे शासनाची दिशाभूल करीत आहेत. या बाबीकडे जि.प. व पं.स. प्रशासन डोळेझाक करताना दिसून येत आहे.राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव अभियान सुरू करून गावाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. या अभियानांतर्गत तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतामुक्त व तंटामुक्त होऊन राज्य, जिल्हा, तालुका, गावपातळीवर बक्षीसपात्र ठरली. मात्र, यातील काही गावे वगळल्यास बहुतांश गावामध्ये या अभियानाचे बारा वाजल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षात हे अभियान प्रभावीपणे राबविणे सुरू होते. गावा-गावामध्ये या स्वच्छता अभियानावर देखरेख ठेवण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती. जो कोणी व्यक्ती उघड्यावर शौचास बसेल त्याला शंभर रुपये दंड देण्याची परवानगी देण्यात आली होती. यामध्ये विविध अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला होता.ग्रामीण भागामध्ये सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिरणारे पथकही अचानक गायब झाले आहे. कोणत्याच गावामध्ये सध्या हे पथक दिसून येत नाही. जाफराबाद तालुक्यात १०२ गावांचा समावेश आहे. या गावांनी शंभरटक्के गाव दुर्गंधीमुक्त झाल्यास तरच या गावांना पाणीपुरवठ्याचा निधी दिला जाईल, अशी अट सुद्धा शासनाने घातली होती. त्यामुळे अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य यांनी गाव दुर्गंधीमुक्त दाखवून शासनाचा निधी गावात आणला होता. परंतु यातील अनेक गावे ही दुर्गंधीमुक्त झालीच नाही. केवळ कागदोपत्री हे अभियान दाखवून निधी उचलण्यात आला. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचाही हात होता. यावर शासनाने कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.शासनाने शासनाची कोणतीही योजना घेताना शौचालय असणे बंधनकारक केले होते. तरच त्या व्यक्तीला अनुदान दिले जाईल, असे आदेश असताना सुद्धा या नियमाचे ग्रामीण भागातील किती ग्रामपंचायतींनी पालन केले हा सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत पं.स.चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना विचारले असता, माझ्या काळामध्ये ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले असून, माझी बदली झाली असली तरी उर्वरित गावांनी गाव दुर्गंधीमुक्त होणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले.अकोला देवचे ग्रामविकास अधिकारी व्ही.टी. जायभाये म्हणाले की, गावामध्ये जो कोणी शौचालय बांधणार नाही, त्याला शासनाचे कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.