शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: September 26, 2016 00:11 IST

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे

लातूर : लातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के धरणात पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा ओघ धरणात सुरूच असून, रात्री कोणत्याही क्षणी मांजरा धरणाची दारे उघडण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठच्या ५३ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सतर्कतेचे आदेश बजावले आहेत. याशिवाय, तावरजा नदीकाठच्या गावांनाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात ३५.०७ टक्के पाणीसाठा झाला असून, जिल्ह्यात इतर मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तावरजा प्रकल्पात ८२ टक्के, रेणा ८६.५० टक्के, व्हटी १०० टक्के, तिरु ११६.६८ टक्के, देवर्जन १०० टक्के, साकोळ १०० टक्के, घरणी १०० टक्के, मसलगा ८२.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अशा एकूण आठ मध्यम प्रकल्पांमध्ये ९४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर १३२ लघु प्रकल्पांमध्ये २६८.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत १५४.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश मोठे, मध्यम व लघु प्रकल्पही भरले असल्याने प्रकल्पाशेजारील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत २०११-१२ ला मांजरा प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यानंतर मात्र परिसरातील गावांना टंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षीही तीच परिस्थिती राहील, अशी शक्यता जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. २०१६ मध्ये आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत मांजरा प्रकल्पामध्ये १६७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४७.१३ टक्के मृतसाठा तर ११९.९४० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापपर्यंत झाला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)