शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत खड्ड्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:52 IST

गल्लीत अंतर्गत सिमेंटचे गट्टू बसविताना गल्लीतील पाणी जाण्याचा मार्ग न सोडल्याने पाणी साचून तयार झालेल्या खड्ड्यात पडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये घडली.

ठळक मुद्देबायजीपुरा येथील घटना : मनपाच्या अधिकारी, ठेकेदारांवर बेजबाबदारपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गल्लीत अंतर्गत सिमेंटचे गट्टू बसविताना गल्लीतील पाणी जाण्याचा मार्ग न सोडल्याने पाणी साचून तयार झालेल्या खड्ड्यात पडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.साहिल रशीद पठाण (१६, रा. गल्ली नंबर १९, बायजीपुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सिडको एन-६ येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी असून, तो याच विद्यालयात बोर्डाची परीक्षा देत होता. रविवारनिमित्त सुटी असल्याने तो आज घरीच होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तो बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये राहणाºया आजीकडे पायी जात होता. ज्या दिवशी गल्लीतील नळाला पाणी येईल, त्या दिवशी या गल्लीतील जलीलभाई यांच्या गिरणीसमोर मोठे पाण्याचे डबके साचते. नळाला पाणी आल्यानंतर गल्लीतून वाहणाºया पाण्याला वाहून जाण्यासाठी असलेली नाली बुजविण्यात आल्याने पाण्याचे मोठे डबके साचते. आज सकाळी साहिल हा डबके ओलांडून पुढे जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो तेथील पाण्यातील ड्रेनेज चेम्बरच्या ढाप्यावर आदळला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो पाण्यात पडला. तेथून जाणाºया लोकांनी त्यास उचलले आणि तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी साहिल यास तपासून मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच साहिलचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने तेथे दाखल झाले. साहिलचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी आहे. त्यास एक मोठा भाऊ आणि लहान बहीण आहे. याविषयी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.गट्टू टाकताना बुजविली सांडपाण्याची नालीसाहिलच्या मृत्यूला गल्ली नंबर १७ मध्ये गट्टू बसविण्याचे काम करणाºया मनपाचा ठेकेदार आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ठेकेदाराने गट्टू बसविताना गल्लीतून वाहणारे पाणी जाण्यासाठी असलेली नाली बुजविली. पाणी जाण्यास मार्गच नसल्याने गल्लीत मोठे डबके साचले.