शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद चौकाने घेतला एकाचा बळी

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

परभणी : शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी ४़३० च्या सुमारास घडली़

परभणी : शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी ४़३० च्या सुमारास घडली़ सिग्नल कार्यान्वित केल्यानंतर घडलेला हा पहिलाच अपघात असल्याने सिग्नल व्यवस्था व वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ १० डिसेंबर रोजी सायंकाळी श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वसमत रस्त्याच्या बाजूने मालवाहू ट्रकच्या (क्रमांक जीजे-२/व्हीव्ही ०७८३) मागील चाकाखाली दुचाकी (क्रमांक एमएच २१/एके-११०) आली़ आणि त्यात चाकाखाली चेंगरून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर एकच धावपळ उडाली़ विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच ही घटना घडली़ घटनेमुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली़ बघ्यांची गर्दी झाली होती़ सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ गर्दी हटविण्याचा प्रयत्न पोलिस कर्मचाऱ्यांनी केला़ या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव शेख महेबूब शेख यासिन (वय ५४) असे आहे़ ते मकदूमपुरा येथील रहिवासी असून, महानगरपालिकेच्या मलेरिया विभागात मुकदम म्हणून सेवेत असल्याची माहिती मिळाली़ घटनेनंतर मनपातील नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.वाहतुकीला शिस्त लावण्यात शहर वाहतूक शाखा अपयशी ठरत आहे. मुळात पोलिसांकडून प्रयत्नच होत नाहीत. सिग्नलच्या ठिकाणी पुरेसे पोलिस कर्मचारी दिले जात नाहीत. परिणामी हे सिग्नल वाहतूक सुरळीत करण्यासाठी की विस्कळीत करण्यासाठी असा प्रश्न पडतो. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे.