शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औषधनिर्माण शास्त्रात कुलगुरूंना पेटंट जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना औषधनिर्माण शास्त्र विषयातील संशोधनाबद्दल भारत सरकारच्या ‘इंटेलेक्‌च्युअल ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना औषधनिर्माण शास्त्र विषयातील संशोधनाबद्दल भारत सरकारच्या ‘इंटेलेक्‌च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ने पेटंट जाहीर केले आहे. कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचे त्यांच्या नावावरचे हे दुसरे पेटंट असून आणखी पाच पेटंटसाठी त्यांनी यापूर्वीच प्रस्ताव दाखल केलेले आहेत.

यासंदर्भात भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियंत्रकांनी २४ फेब्रुवारी रोजी डॉ. प्रमोद येवले यांना पेटंट प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. डॉ. येवले यांनी या कार्यालयाकडे ७ सप्टेंबर २०१५ रोजी ‘सिंथेसिस ऑफ चिताेसॅन ग्राफ्ट एचपीबीसीडी को पॉलिमर बाय वन पॉट सिंथेसिस टेक्निक फॉर सॉल्युबिलिटी एन्हान्समेंट ऑफ ऑफेफॅविरेन्ज’ या औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनाबद्दल पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावास पेटंट कार्यालयाने २४ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. आरती बेलगमवार व डॉ. शगुफ्ता खान यांनीही या पेटंटसाठी संशोधन कार्य केले आहे. या पेटंटचे हक्क २० वर्षांसाठी असणार आहेत.

यापूर्वी १ मार्च २०२० रोजी ‘प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ इंटरनल इफाविटेन्झ नॅनो पार्टीकल्स फॉर सीएनएस टार्गेरिंग इन न्युरो एड्‌स’ या डॉ. येवले यांच्या संशोधनास ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया‘ने पेटंट जाहीर केले होते. यासाठी ७ डिसेंबर २०१६ रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. या पेटंटचा अवधी देखिल २० वर्षांचा आहे.