शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंनी मांडला पंचवार्षिक ‘व्हिजन प्लॅन’

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळवून महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळवून महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. आगामी पाच वर्षांत संशोधन व नावीन्याचा शोध या माध्यमातून भारतातील टॉप टेन विद्यापीठांत येण्यासाठी आपण सर्व जण मिळून सामूहिक प्रयत्न करूया, असा विश्वास कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यक्त केला. विद्यापीठाची कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. चोपडे यांनी प्राध्यापक, विभागप्रमुखांशी संवाद साधला. विद्यापीठ नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडी संचालक डॉ. एस.पी. झांबरे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ. अशोक चव्हाण, डॉ. एस.टी. सांगळे, डॉ. किशन धाबे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख यांच्यासह दोनशेहून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. कुलगुरूंनी २०१४ ते २०१९ या काळातला व्हिजन प्लॅन कुलगुरूंनी मांडला. त्यांनी सांगितले की, भारतातील साडेपाचशेपैकी केवळ ६५ विद्यापीठांना ‘अ’ दर्जाचे मानांकन आहे. यात आपले विद्यापीठ हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले एकमेव आहे. उत्कृष्ट संशोधन व नावीन्यातून शोध या माध्यमातून आपण नाव मिळवू शकतो. यासाठी २५ वर्षांचे संशोधनाचे नियोजन करावे लागेल. ५० तरुण प्राध्यापक तसेच २५ अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर व प्रतिवर्षी १०० विद्यार्थ्यांना संशोधन छात्रवृत्ती देण्यात येईल. परिसरात रिसर्च पार्कची स्थापना, उद्योजकीय कौशल्यतेचा विकास, बायोटेक व नॅनोटेक संस्थांची स्थापना करण्यात येईल. व्यवसाय मार्गदर्शन, परीक्षा पद्धतीत सुधारणा, जैविक विविधता, योगा, सौरऊर्जा, लिबरल आर्टस्, कौशल्य व विकास यावर आधारित अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, केंद्र व राज्य सरकार आणि बहि:स्थ शिक्षणाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत १ हजार कोटींचा निधी उभारण्याचा मानस कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात कुलगुरूंनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ‘रोड मॅप’ आखला. कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सर्व जण मिळून विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात यशस्वी होऊ, असे कुलगुरू डॉ. धनराज माने म्हणाले.