शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

लातूर : मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यावर चालू उन्हाळ्यात तहान भागवावी लागणार आहे़

लातूर : मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यावर चालू उन्हाळ्यात तहान भागवावी लागणार आहे़ लातूर शहराला दररोज ३५ एमएलडी पाणी लागते़ या प्रमाणात प्रकल्पातून पाणी घेतले तर उन्हाळा तीव्र जाणार आहे़ त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दहा दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे़ सध्या आठ दिवसाआड पाणी सोडले जाते़ मे अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी एप्रिल पासून दहा दिवसाला पाणी सोडले जाणार आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील विहिरींची पाणीपातळी अडीच मिटरने घटल्याने तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे़ लातूर शहराला मांजरा प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य ठिकाणचे पाणी देण्याची सोय अद्याप झाली नाही़ त्यामुळे आहे ते पाणी काटकसरीने वापर करुन उन्हाळा घालविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे़ सध्या मांजरा प्रकल्पात १३़४०८ दलघमी पाणी आहे़ हे पाणी झपाट्याने कमी होत आहे़ लातूर शहराबरोबर अंबाजोगाई, केज, धारुर, कळंब आदी शहरांनाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. प्रकल्पातील ८० टक्के पाण्याचा वापर लातूर शहरासाठी तर उर्वरित २० टक्क्यामध्ये अंबाजोगाई, केज, धारुर व कळंब या शहराला दिले जाते़ त्यामुळे सध्यातरी काटकसर हाच पर्याय आहे़ लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाण्याने तळ गाढला आहे़ तावरजा, व्हटी व मसलगा प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आहे़ रेणा, तिरु, देवर्जन, साकोळ व घरणी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा आहे़ मात्र हे पाणी लातूरला आणणे अशक्य आहे़ त्या-त्या भागातील गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे मांजरा प्रकल्पावरच शहराची तहान आहे़ सध्या तावरजा मध्यम प्रकल्पात ०़३३२, व्हटी ०़२१५, रेणापूर १़४७३, तिरु ६़५१०, देवर्जन २़४७२, साकोळ ०़५८८, घरणी ५़४३२ दलघमी पाणी आहे़ शिवाय, विहिरींचीही पाणीपातळी खालावली आहे़ त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे़ पाणी काटकसरीने न वापरल्यास टंचाईचा सामना करावा लागेल़ (प्रतिनिधी)यंदाचा उन्हाळा तीव्र पाणीटंचाईचा असून, गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यात सरासरी जिल्ह्याची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. यंदा ८.१८ मीटरवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २.५५ मीटरने पाणीपातळी घटली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०.२१ मीटरने औसा तालुक्याची पाणीपातळी असून, जळकोट तालुक्यात सर्वाधिक ४.२८ मीटरची घट आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निरीक्षण केले असून, या निरीक्षणात ८.१८ मीटरवर पाणीपातळी असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत याच विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत ५.५५ मीटर्सची घट निरीक्षणाअंती समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, या विहिरीतील पाणीपातळी मागील पाच वर्षांत ५.४७ होती. आता ७.७४ वर गेली आहे. २.२७ मीटरची घट आहे. तर औसा तालुक्यातही १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ७.२३ होती. आता १०.२१ असून, २.९८ ची घट आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.१० मीटर पाणीपातळी होती. आता ७.३३ वर आहे. २.२३ मीटरची घट असल्याचे निदर्शनास आले आहे. लातूर तालुक्यात १८ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.३६ मीटर पाणीपातळी होती. आता ७.६२ असून, २.२६ ची घट आहे. निलंगा तालुक्यात १७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.८२ मीटर पाणीपातळी होती. आता ९.३३ वर आहे. २.५१ मीटरची घट आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.२८ मीटर पाणीपातळी होती. आता ९.२० मीटर असून, २.९२ मीटरची घट आहे. रेणापूर तालुक्यात ११ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ५.१८ मीटर होती. आता ४.४८ मीटर असून, २.३० ची घट आहे. लातूर शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात २६ टँकरने ४४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ शहरातील विंधनविहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे़ शिवाय, मांजरा प्रकल्पातील पाणी कमी होत असल्याने, शहरातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़ शहरालगत असलेल्या वस्त्यांत तीव्र पाणीटंचाई आहे़ या वस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, असे प्रस्ताव येत आहेत.