शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

व्हेंटिलेटर्स नादुरुस्तच; दिल्लीतील तज्ज्ञांकडून ५ तास पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला (घाटी) पुरविलेल्या १५० निकृष्ट व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दिल्लीतील दोन ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला (घाटी) पुरविलेल्या १५० निकृष्ट व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दिल्लीतील दोन रुग्णालयांतील वरिष्ठ डाॅक्टर घाटीत दाखल झाले. तब्बल ५ तासांवर केलेल्या पाहणीत व्हेंटिलेंटर्स नादुरुस्तच असल्याचे समोर आल्याची माहिती घाटीतील सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवस घाटीसह ज्या रुग्णालयांत हे व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत, त्यांचीही पाहणी करून अहवाल दिला जाणार आहे.

केंद्र सरकारकडून घाटीला प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर्सची नादुरुस्तीची अवस्था सर्वप्रथम ‘लोकमत’ने समोर आणत विविध वृत्तांमधून त्यासंदर्भात पाठपुरावा केला. घाटी रुग्णालयात गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दिल्लीतील सफदरजंग हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. अरीन चौधरी आणि आरएमएल हाॅस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डाॅ. रूपेश यादव हे दाखल झाले. प्रारंभी, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुुरेश हरबडे, वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. विकास राठोड, डाॅ. संजय वाकूडकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर मेडिसिन विभागात ज्याठिकाणी निकृष्ट व्हेंटिलेटर ठेवण्यात आलेले आहेत, त्याठिकाणी ते रवाना झाले. मेडिसिन विभागातील एका रिकाम्या वाॅर्डात रांगेत ठेवलेल्या व्हेंटिलेटर्सची त्यांनी पाहणी केली. ही पाहणी करताना मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. अमोल जोशी यांच्याशी संवाद साधत त्यांनी माहिती घेतली.

घाटी रुग्णालयाला प्राप्त झालेल्या १५० पैकी काही व्हेंटिलेटर्स शहरातील खाजगी रुग्णालयांना आणि अन्य जिल्ह्यांना देण्यात आली आहेत. हे वरिष्ठ डाॅक्टर याठिकाणीही भेट देऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल तयार करून तो केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. हा तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

चौकट...

व्हेंटिलेटर नादुरुस्तच आढळले

या वरिष्ठ डाॅक्टरांनी पाहणी केली, तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर नादुरुस्तच आढळून आले, अशी माहिती घाटी रुग्णालयातील सूत्रांनी दिली. पाहणी सुरू असताना मेडिसिन विभागात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

ऑडिट झाले?

व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी एक पथक येऊन गेले, त्यांच्याकडूनही सविस्तर पाहणी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली; परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व्हेंटिलेटर्ससंदर्भात काहीही न बोलण्याची भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे.

फोटो ओळ....

दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ डाॅक्टरांनी घाटीतील मेडिसिन विभागात ठेवलेल्या नादुरुस्त व्हेंटिलेटर्सची पाहणी करीत घाटीतील डाॅक्टरांशी संवाद साधला.