शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयुक्त इंधनाने बंद पडली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:14 IST

परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. इतर नागरिकांच्या वाहनातही पाणीयुक्त इंधन भरल्यामुळे ती वाहने बंद पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. इतर नागरिकांच्या वाहनातही पाणीयुक्त इंधन भरल्यामुळे ती वाहने बंद पडली.औरंगाबाद शहरातील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त इंधन वाहनात भरण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. मराठवाड्यातील सर्वच पेट्रोलपंप तपासण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.इतर वाहनांनी गेवराईपर्यंत प्रवास करून भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ.भागवत कराड, बालाजी मुंडे व इतर पदाधिकारी टॅक्सीने परळीकडे रवाना झाले. त्यांच्या चारचाकीलाही टोचण लावून गेवराईपर्यंत नेल्यानंतर तेथे दुरस्तीसाठी संबंधित वाहन मोबाईल गॅरेजच्या हवाली करण्यातआले.राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर भाजप पदाधिका-यांनी इंधन भरल्यानंतर फॉर्च्युनर चालू झालीच नाही. इतर नागरिकांची वाहनेदेखील इंधन भरल्यानंतर सुरू झाली नाहीत. त्यामुळे वाहनातील इंजिनमध्ये तपासणी केली असता पाणी आणि इंधन एकत्रच बाहेर आले. याप्रकरणी डॉ. कराड यांनी जालना पुरवठा अधिकारी आर. एस. नंदकर यांच्याकडे तक्रार केली. शिवाय हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक थॉमस यांच्याकडेही घडलेला प्रकार सांगितला.पुरवठा अधिकारी म्हणालेजालन्याचे पुरवठा अधिकारी नंदकर यांनी सांगितले, औरंगाबादेत एच.पी.चे विक्री अधिका-यांचे कार्यालय आहे. त्यांना याप्रकरणी कळविले आहे. तसेच तलाठी आणि मंडळ अधिका-याला भोकरवाडीतील त्या पेट्रोलपंपावर इंधनाचे नमुने घेण्यासाठी पाठविले आहे.