शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या वेगमर्यादेचे फलक फक्त नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास ...

औरंगाबाद : विविध रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा किती असावी, असे फलक पाहायला मिळतात. मात्र, वाहनचालक हे फलक वाचत नसून सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गण’ यंत्राद्वारे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

पोलिसांकडून होणारी कारवाई टाळायची असेल, तर वाहनधारकांना बीड बायपासवर ताशी ३० किमी आणि जालना रोडवर ४० किमी वेगमर्यादा पाळावी लागेल. दरवर्षी सुसाट वाहनांमुळे प्राणांतिक अपघातात अनेक वाहनचालकांचे बळी जातात. हे अपघात रोखण्यासाठी शासनाने वाहनांच्या वेगमर्यादा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१७ साली अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी एक परिपत्रक जारी केले. यासोबतच वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक शहराला दोन ‘स्पीड गण’ मशीन, तर महामार्ग पोलिसांनाही अशी यंत्रे देण्यात आली आहेत.

मनपा हद्दीतील जळगाव रोड, व्हीआयपी रोड, जालना रोड, सोलापूर-धुळे महामार्ग आदी रस्त्यांवर ९ आसन क्षमतेपर्यंत चारचाकी वाहनांसाठी ७० किलोमीटर प्रती तास, तर ९ किंवा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांसाठी ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता ६० किमी प्रती तास वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. दुचाकी मोटारसायकल, मोपेड आदी वाहनांकरीता ताशी ६० किमी, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षा, लोडिंग रिक्षा प्रती तास ५० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली.

------------------------

दोनच रस्त्यांवर कारवाई, अन्य मार्गावर मात्र वाहने सुसाट

वाहनांची गती मोजण्यासाठी औरंगााबाद पोलीस विभागाकडे असलेल्या दोन ‘स्पीड गण’ यंत्रापैकी एक वाळूज रोडवर आणि दुसरे बायपासवर नजर ठेवून आहे. मात्र, अन्य रस्त्यांवर सुसाट वाहनचालक मोकाटच आहेत.

-----------------------

चौकट

वेगमर्यादा कमी केल्याने अपघात घटले

बीड बायपासवर गतवर्षी अपघाताची मालिका रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विशेष अधीसूचना काढून बायपासवरील वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किमी अशी केली होती. या वेगमर्यादेमुळे बायपासवरील अपघात कमी झाले आहेत.

--------------------------------

वाहतूक विभागाकडे दोन स्पीड गण यंत्रे (इंटरसेप्टर) यंत्रे आहेत. ही यंत्रे वेगवेगळ्या रस्त्यावर नेऊन वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.- सुरेश वानखेडे, एसीपी, वाहतूक विभाग