शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंड; आर्थिक कोंडी !

By admin | Updated: March 4, 2017 00:26 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरातील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील यंत्रणा कोलमडल्याने केंद्राबाहेर तूर घेऊन आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरातील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील यंत्रणा कोलमडल्याने केंद्राबाहेर तूर घेऊन आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बारदाण्याअभावी हजारो क्विंटल वाहनांत गेल्या चार दिवसांपासून पडून आहे. या वाहनांच्या दररोजच्या भाड्याचा खर्च शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावा लागत आहे. या आर्थिक भुर्दंडाला संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. या तूर खरेदी केंद्रावर लातूरसह इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपली तूर विक्रीसाठी आणली आहे. एका गावातून किमान चार शेतकऱ्यांनी एका वाहनात ही तूर आणली आहे. प्रति दिवस या वाहनाला दोन ते अडीच हजार रुपये भाडे आहे. गेल्या चार दिवसांपासून या तुरीचा काटा न झाल्यामुळे तूर वाहनांतच पडून आहे. परिणामी, दिवसागणिक वाहनांचे भाडे वाढत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडचे अधिकारी या संबंधी शेतकऱ्यांना बोलायला तयार नाहीत. आज खरेदी सुरू होईल. उद्या होईल, असे सांगितले जात आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून आमच्या तुरीचा अजूनही काटा झाला नाही, अशी माहिती चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथील शेतकरी बालाजी मुर्के, नागनाथ स्वामी यांनी दिली. (प्रतिनिधी)