शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून वाहन लुटणारे गजाआड

By admin | Updated: July 3, 2017 00:59 IST

जालना : जालना-देऊळगावराजा रस्त्यावर चालकास मारहाण करून वाहन लंपास करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना-देऊळगावराजा रस्त्यावर चालकास मारहाण करून वाहन लंपास करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ४० हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत.ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे बॉबी शिवाजी राऊत (२१, रा. राऊतनगर), शंकर उर्फ संतोष भोलेनाथ जाधव (२३, रा.खरपुडी, ह. मु. साईलॉज), अशी आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले, की जालना-देऊळगावराजा रस्त्यावर शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी सय्यद वसीम सय्यद आसिफ (रा.अकोला) यांचे छोटा हत्ती वाहन अडविले. त्यांना वाहनातून खाली ओढत जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर एकाने छोटा हत्तीसह व दुसऱ्या दुचाकीवरून पोबारा केला. या प्रकरणी सय्यद वसीम यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, वरील दोघा संशयितांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, संशयित बॉबी राऊतला पोलिसांनी शनिवारी रात्री औरंगाबादेतून तर संतोष जाधव यास रविवारी सकाळी गायत्रीनगरातून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरलेले वाहन जप्त केले. मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक वारे, कमलाकर अंभोरे, गोकुळसिंग कायटे, संतोष सावंत, भालचंद्र गिरी, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, मदन बहुरे, विलास चेके यांनी ही कारवाई केली.