शिरूर अनंतपाळ : येथील एका शेतकऱ्याने प्लॉटमध्ये फुलविलेल्या परसबागेत तब्बल डझनभर भाज्यांची लागवड केली आहे़ चारशे फुटांत ५० हजारांचे उत्पादन घेतले आहे़ त्यामुळे परसबागेत फुललेल्या भाज्यांची पाहणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़येथील राज्यमार्गाशेजारी असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीतील बाबुराव जंबुरे या शेतकऱ्याने प्लॉटमध्ये असलेल्या विंधन विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला आहे़ प्लॉटच्या सभोवतालच्या खुल्या चारशे फुट जागेत बारा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली आहे़ शिवाय, दुष्काळी परिस्थती असतानाही ५० हजारांचे उत्पादन घेतले आहे़ त्यामुळे परसबागेत फुललेल्या डझनभर भाज्यांची पाहणी करण्यासाठी गर्दी करीत आहेत़प्लॉटमध्ये चवळी, वरणा, भेंडी, मटकी, टोमॅटो, दोडका, कोथींबीर, लसूण, कांदे, वांगे, काकडी, अळू या भाज्यांसह मूग, उडीद, तूर व सोयाबीन पिकेसुद्धा आहेत़ बाबुराव जंबुरे म्हणाले, वर्षभर भाज्या खरेदी करण्याची गरज पडत नाही़ त्यामुळे प्रत्येकाने परसबाग फुलविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले़(वार्ताहर)
परसबागेत फुलविल्या भाज्या !
By admin | Updated: July 8, 2016 00:37 IST