शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST

गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

गेवराई : मागील पंधरा दिवसांपूर्वी कडाडलेले भाजीपाल्याचे भाव आवक वाढल्याने घसरले आहेत. भाजीपाला स्वस्त होत असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने भाजीपाल्याचे पीक कमी प्रमाणात घेण्यात आलेले आहे. मात्र मागील आठदिवसांपासून बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला आयात केला जात असल्याने आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. परिणामी ८० रुपये किलोने मिळणारी कोबी ४० ते ४५ रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागली आहे. दुष्काळी स्थितीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पीक घेतलेले नाही. यामुळे ग्राहकांना वाढीव पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागला. सध्या बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आठवडी बाजारामध्ये येत असल्याने भाव घसरत आहेत. मात्र घसरलेला भाजीपाला अजून किती दिवस कमी भावात ग्राहकांना मिळेल हे नक्की सांगता येणार नाही, असे येथील व्यापारी रफिक बागवान यांनी सांगितले. आज स्थितीत ८० रुपयांना मिळणारा दोडका ४० रुपये किलोवर आला आहे. या बरोबरच शेवगा, टोमॅटो, लसण, कांदे, कोबी, मेथी याचेही भाव घसरले आहेत. यामुळे गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाला आला नाही तर केंव्हाही भाजीपाल्याचे भाव कडाडू शकतील, असे येथील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(वार्ताहर)