शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला मातीमोल

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

बीड येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत.

राजेश खराडे  बीडयेथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत. आडतीवर किलोवर होणारी विक्री व्यापाऱ्यांकडून कॅरेटवर केली जात आहे. सर्रास पालेभाज्यांची विक्री २ ते ३ रुपये प्रतिकिलोप्रमाणे होत आहे. रात्री उशिरापर्यंत विक्री न झाल्यास बसल्या ठिकाणीच शेतकरी भाजीपाला सोडून मार्गस्थ होत आहेत.मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला होता. साधारणत: जून-जुलैमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. गत आठवड्यापर्यंत मेथी, पालक, चुका, हरभरा यांची विक्री १० रुपयांत ५ जुड्या याप्रमाणे होत होती, तर बटाटा, टोमॅटोला २० रुपये किलोचा दर असल्याने किमान रोजगार तरी उपलब्ध होत होता; मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर आवक होऊ लागली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर घसरले आहेत.गेल्या तीन वर्षांत दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यावेळी मात्र दर आकाशाला भिडले होते. सध्या अधिकचे उत्पादन झाल्यामुळे दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी होत आहे. बीड येथील खासबाग देवीच्या पाठीमागे भरल्या जाणाऱ्या बाजारात अहमदनगर, कर्जत, आष्टी, जामखेड, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून आवक होत आहे.५० रुपये कॅरेटप्रमाणे कोबी, टोमॅटो, बटाट्यांची खरेदी करून विक्रेते तोच माल भाजीमंडईत ३ ते ४ रुपये किलोने विकत आहे. एका कॅरेटमध्ये जवळपास २० किलो एवढ्या भाज्या मावतात. भाजी मंडईत अशी अवस्था असूनदेखील ग्राहकांकडून यापेक्षाही कमी दरात भाज्यांची मागणी होत आहे. त्यामुळे हताश होऊन विक्रेते आहे तसाच ठेवून मार्गस्थ होणे पसंत करीत आहेत.