शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रम

By admin | Updated: February 6, 2017 23:11 IST

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उस्मानाबाद येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरूवारपासून विविध कार्यक्रम होणार आहे

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उस्मानाबाद येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरूवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी दिली़शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात गुरूवापासून या महोत्सवास प्रारंभ होत आहे़ नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्याते निलेश जगताप (पुणे) यांचे ‘ढाल तलवारीच्या पलिकडचे शिवराय व शंभूराजे’ या विषयावर व्याख्यान होणार असून, याचे उद्घाटन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ़ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे़शुक्रवारी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा हास्यविनोदी कार्यक्रम, शनिवारी शिवशाहीर राजेंद्र कांबळे (अकलूज) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम रंगणार असून याच कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून अंध मुलांना १०० काठी (स्टिक) चे वाटप प्रहार संघटना व मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे़ रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रवीण गायकवाड (पुणे) यांचे ‘छत्रपती शिवराय ते छत्रपती शाहू महाराज-प्रेरणा’ या विषयावर व्याख्यान, १३ रोजी ‘गारवा’फेम गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा गप्पा व गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. १४ रोजी ‘शिवकालीन चित्रकला’ यावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा तर १५ फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ १७ रोजी प्रा़ मनोहर भोळे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व चर्चासत्र होणार असून, १८ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे़ रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी गृहमंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात येणार असून, सकाळी ९़३० वाजता माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होणार आहे़ याच दिवशी सायंकाळी ४ वाजता शिवजन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे़ याचा शुभारंभ आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होईल. (प्रतिनिधी)