बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी रविवार (दि. २७) रोजी फॅन्सी ड्रेस, एकपात्री नाटक या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.सखी मंचच्या सदस्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा होत आहेत. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी दुपारी ४ वाजता स्पर्धांना सुरूवात होणार आहे. याचे मुख्य प्रायोजक स्वामी विवेकानंद योगा अॅन्ड मेडिटेशन सेंटर हे आहेत. ही संस्था योगप्रशिक्षणासाठी विशेष मोहीम शहरात राबवित आहे. महिलांसाठीही प्रथमच योगप्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था आहे. सहप्रायोजक म्हणून संकल्प वॉच अॅण्ड सारीज् हे आहेत. एन.के. सारीज्, माहेर स्टील यांच्या वतीने गिफ्टचे वाटप करण्यात येणार आहे.स्पर्धेला येताना सखीमंच सदस्यांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. ‘लकी ड्रॉ’ चेही आयोजनलोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोजित केलेल्या ‘लकी ड्रॉ’ ची सोडत व त्यानंतर बक्षीस वितरण केले जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सखी मंच संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सखी मंच सदस्यांसाठी आज विविध स्पर्धा
By admin | Updated: July 27, 2014 01:10 IST