शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

विविध विमान कंपन्यांची सोमवारी शहरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद : पर्यटन विकासाला बळ देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या औरंगाबाद येथून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांना जोडणारी एअर इंडिया आणि जेट एअर लाईन्स कंपनीची हवाईसेवा आहे. सोमवारी होणाºया बैठकीत एअर इंडिया, जेट एअरवेज, विस्तारा एअर लाईन्स, गो एअर, डेक्कन एअरलाइन्स आदी डोमेस्टिक कंपन्या सहभागी होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत औरंगाबादची कनेक्टिव्हिटी कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी असावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतही चाचपणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर-उदयपूर-दिल्ली, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह औरंगाबाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.बहुतांश चिनी, जपानी, श्रीलंकन पर्यटक अजिंठा, वेरूळ पाहण्यासाठी येतात, त्यामुळे औरंगाबाद हे विमानतळ बुद्धिस्ट सर्किटला जोडले गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जागृती होईल.मुंबई विमानतळालापर्याय ठरणारमुंबई विमानतळावरील गर्दीला पर्याय म्हणून, तसेच जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे मुक्कामासाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात का, याचीही शक्यता तपासली जाईल. औरंगाबाद येथून विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरू करता येईल या पयार्याची तपासणी करण्याची मागणी खा. दानवे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद