शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्ड सुरक्षा दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:49 IST

१०० तरुणांचे वॉर्ड सुरक्षा दल तयार करण्यात आले

ठळक मुद्देभाग्यनगर पोलिसांनी आता कम्युनिटी पोलिसिंगतरुण गटागटाने ठरवून दिलेल्या भागात रात्रभर दुचाकीवरुन पेट्रोलिंग करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत सातत्याने घरफोडी आणि चोरीच्या घटना घडत आहेत़ त्यामध्ये होणारी वाढ लक्षात घेता भाग्यनगर पोलिसांनी आता कम्युनिटी पोलिसिंग सुरु केली आहे़ त्याअंतर्गत १०० तरुणांचे वॉर्ड सुरक्षा दल तयार करण्यात आले असून ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे़ त्यामुळे गेल्या काही महिन्यांत या भागातील चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे़भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार मोठा आहे़ त्यामुळे पेट्रोलिंगसाठी पोलिसांची गैरसोय होते़ त्यात चोरट्यांसाठी तर ही हद्द सोयीचीच झाली होती़ कुलूपबंद घर दिसताच चोरट्यांकडून दिवसाढवळ्या डल्ला मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ त्यात भ्रमणध्वनी, सोनसाखळी चोरटेही सक्रिय झाले होते़या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, सपोनि शरद मरे, आऱजी़ सांगळे, पोउपनि चंद्रकांत पवार यांनी या भागात वॉर्ड सुरक्षा दलाची स्थापना केली़ त्यामध्ये भाग्यनगर हद्दीतील १०० तरुणांचा समावेश आहे़ या तरुणांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत़ आठवड्यातून एक दिवस हे तरुण गटागटाने ठरवून दिलेल्या भागात रात्रभर दुचाकीवरुन पेट्रोलिंग करणार आहेत़ त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारीही असणार आहे़ पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे गेल्या काही महिन्यांत या भागातील चोरीच्या घटनांमध्ये जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे़ त्याचबरोबर पोलीस आणि नागरिकांचा थेट संवादही होत आहे़‘आपला शेजारी खरा पहारेकरी’चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रमही सुरु करण्यात आला आहे़ त्यानुसार बाहेरगावी जाणार असाल तर शेजाºयांना माहिती द्या, घर बंद करुन जाताना घरात रोख रक्कम, दागिने असा ऐवज ठेऊ नका, कडीकोंड्याऐवजी सेंट्रिंग लॉकचा वापर करा, दरवाजाला आय होल असणे आवश्यक आहे़ अनोळखी इसम, भविष्य वर्तविणारा, सोने उजळून देणाºयाला घरात प्रवेश देऊ नये, आपआपल्या भागात सामूहिक प्रयत्नातून सीसीटीव्ही लावण्याकरिता प्रयत्न करावेत, खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करा, दूधवाला, भाजीविक्रेते, चालक, इलेक्ट्रीशियन, घरकाम करणारे यांचा संपूर्ण पत्ता आणि फोटो ठेवावा, शेजारी बांधकाम सुरु असल्यास कामगार, ठेकेदाराची संपूर्ण माहिती ठेवावी, बाहेरगावी जाताना घरातील दिवे सुरु ठेवावेत, रात्रीच्या वेळी घराबाहेरील दिवा सुरु ठेवावा, जेणेकरुन पोलिसांना पेट्रोलिंग करताना मदत होईल, बाहेरगावी असल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़