शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत ‘मेडिकोलीगल केसेस इन अ‍ॅनाटॉमी’ परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:58 IST

डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करून त्यासंदर्भात प्रमाणपत्र दिल्यावर शवविच्छेदनाची मुळीच आवश्यकता नसते; परंतु अनेकदा दिलेल्या कारणावर शंका व्यक्त होते आणि शवविच्छेदन केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करून त्यासंदर्भात प्रमाणपत्र दिल्यावर शवविच्छेदनाची मुळीच आवश्यकता नसते; परंतु अनेकदा दिलेल्या कारणावर शंका व्यक्त होते आणि शवविच्छेदन केले जाते. अशा घटनांत शवविच्छेदनानंतर फार काही वेगळे कारण आढळून आलेले नाही. राज्यात २७ टक्के शवविच्छेदन अनावश्यक झाल्याचे समोर आले. त्यापोटी ९.५० कोटी रुपये खर्च झाल्याचे सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागातर्फे मंगळवारी (दि.१९) ‘मेडिकोलीगल केसेस इन अ‍ॅनाटॉमी’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत डॉ. खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद््घाटन झाले. यावेळी परिषदेचे आयोजन अध्यक्ष विभागप्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. कैलास झिने, डॉ. गौतम श्रॉफ, डॉ. प्रतिमा कुलकर्णी-तुंगीकर, डॉ. अझर सिद्दीकी, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. परिषदेत न्यायवैद्यक प्रकरणाविषयी विविध मुद्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.डॉ. खांडेकर म्हणाले की, डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. एकाच रुग्णावर अनेक डॉक्टर उपचार करतात. अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला, तर सर्वात शेवटी तपासणी केलेल्या डॉक्टरने मृत्यूचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. शवविच्छेदनासंबंधित कायद्यात व्यापक सुधारणेची गरज आहे. ११८ वर्षांपासूनच्या कायद्यानुसारच शवविच्छेदन होते. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. शिवाजी सुक्रे यांनी प्रास्ताविककेले.डॉक्टरांना शवविच्छेदन करून घेण्याचा अधिकार आहे, हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात एखाद्याचे शवविच्छेदन करावे की नाही, हा अधिकार पोलिसांचा आहे. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे. यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आता अनावश्यक शवविच्छेदनाचे प्रमाण कमी होत असल्याचे डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.