शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर नगरपालिकेसाठी दुपारी २ पर्यंत झाले ३८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:57 IST

 नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ५४  उमेदवार उभे आहेत.

ठळक मुद्देपालिकेच्या निवडणुकीसाठी ५१ बूथ तयार करण्यात आले आहेत. शहरातील ११ प्रभागात नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी ५९  उमेदवार निवडणूक रिंगणात

 वैजापुर : येथील नगरपालिकेसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ५४  उमेदवार उभे आहेत.

मतदानासाठी सकाळपासूनच मतदात्यांचा उत्साह पाहण्यास मिळाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यन्त २८.९३ टक्के मतदान झाले. यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.१२) होणार आहे.

पालिकेच्या निवडणुकीसाठी ५१ बूथ तयार करण्यात आले आहेत. शहरातील ११ प्रभागात नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी ५९  उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ३७ हजार ७३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.ही निवडणूक प्रक्रिया  निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.तसेच प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय राखीव कर्मचाऱ्यांची नेमणुकसुद्धा करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी स्वतंत्र मतदान यंत्र आहे. 

यावेळी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम यासह अपक्षांमध्ये लढत होत आहे. सर्वात जास्त चुरस भाजपाचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या सुन ताशफा अजहर अली यांच्यात आहे. मतदार कोणाच्या हाती सत्ता देतील यासाठी सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकnagaradhyakshaनगराध्यक्षMuncipal Corporationनगर पालिकाcollectorजिल्हाधिकारी