शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात सेनेचे मार्गदर्शन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:02 IST

आर. एम. वाणी यांची घोषणा : रमेश बोरनारे आमदारकीचे उमेदवार

वैजापूर : येथील शिवसेनेच्या मार्गदर्शन शिबिरात येत्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात सेनेकडून आमदारकीचे उमेदवार जि.प. सदस्य रमेश बोरनारे हे राहतील, असे माजी आमदार आर.एम. वाणी यांंनी जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खा. चंद्रकांत खैरे व उपनेते विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी येथे झालेल्या बैठकीत वाणी यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली.आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचेही वाणी यांनी सांगितले. खा. खैरे यांच्यासह इतर वक्त्यांनीही हाच धागा पकडून भाष्य केले. मात्र उमेदवार ठरविण्याचा अधिकार आपल्याला नसून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल, असे सांगत खैरे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी वाणींच्या विधानाला छेद दिला. यावर शिबिरात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती. बोरनारे यांच्या नावाचे टाळ्यांच्या कडकडात स्वागत करण्यात आले व यानंतर काही वेळातच बोरनारे यांच्या उमेदवारीचा मॅसेज सोशल मिडियावरुन व्हायरल झाला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भगवा फडकवणारच असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी शिबिरात व्यक्त केला.वैजापूर व गंगापूर मतदारसंघातील शाखाप्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिकांचे ‘भगवा फडकवणारच’ हे मार्गदर्शन शिबीर शनिवारी गंगापूर रस्त्यावर साई लॉन्समध्ये आयोजित करण्यात आले होते. वाणी हे माजी आमदार असून त्यांच्याकडे पक्षाचे कुठलेही पद नाही. त्यांचा सल्ला मात्र विचारात घेतला जाऊ शकतो. वैजापूर मतदारसंघात वाणी हेच उमेदवार असावेत, असे अनेकांचे मत आहे. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे शिवसेनेला तगडे आव्हान आहे.शिबिराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, जि.प. सदस्य अविनाश गलांडे, संजय निकम, उपजिल्हा प्रमुख संतोष काळवणे, वैशाली पाटील, लता पागारे, रंजना कुलकर्णी, आनंदीबाई अन्नदाते, वर्षा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाणी यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशान साधले. भाजपकडे आमदारकीसाठी वैजापुरात उमेदवार नाही. तरी त्यांचे नियोजन सुरु असल्याने सेनेने भाजपला गृहित धरु नये, असे घोसाळकर यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक