संजय तिपाले , बीडसाथीच्या आजारांनी जिल्हाभर हातपाय पसरलेले असताना आरोग्य विभागातील रिक्त पदांचा ‘ताप’ काही मिटायला तयार नाही. त्यामुळे साथरोगाला अटकाव होण्याऐवजी दिवसेंदिवस भरच पडू लागली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्यसेवकपदापर्यंत रिक्तपदांचा अनुशेष आहे. ही पदे अनेक वर्षांपासून भरली जात नसल्याने आरोग्ययंत्रणाच ‘सलाईन’वर आहे. जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८० उपकेंद्रे, १३ ग्रामीण रूग्णालये आहेत़ जि़ प़ कडील आरोग्य सेवकांच्या १५३ पैकी केवळ ९२ जागा भरलेल्या आहेत़ मलेरिया विभागाकडे आरोग्य सेवकांची १० पदे रिक्त आहेत़ टाकरवण, धामणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकही वैद्यकीय अधिकारी नाही़ जागा भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़
रिक्त पदांचाच ‘ताप’
By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST