शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

रिक्त पदांमुळे कामगार कार्यालयाला घरघर

By admin | Updated: January 18, 2015 00:30 IST

बीड : येथील जिल्हा सहकारी कामगार कार्यालयाला पुरेसे कर्मचारी नसल्याने नोंदणी करण्यासाठी आलेल्या कामगारांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत,

बीड : येथील जिल्हा सहकारी कामगार कार्यालयाला पुरेसे कर्मचारी नसल्याने नोंदणी करण्यासाठी आलेल्या कामगारांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत, असे जिल्हा बिल्डींग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ या कार्यालयातील १५ पैकी तब्बल १२ पदे रिक्त आहेत़शहरातील शाहूनगर भागात सहकारी कामगार कार्यालय आहे़ या ठिकाणी कामगरांची नोंदणी करण्याचे काम केले जाते़ मात्र या कार्यालयाला मागील दोन वर्षांपासून रिक्त पदांची घरघर लागल्याने कामगारांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आहेत़अशी आहेत मंजूर पदेबीड कार्यालयासाठी जिल्हा कामगार अधिकारी, मिनिमम वेजेस इन्स्पेक्टर (किमान वेतन अधिकारी) यांची सहा पदे तर शॉप इन्स्पेक्टर (दुकान निरीक्षक) चे एक पद, क्लार्क (लिपीक) ची दोन आदी पदे शासनाने मंजूर केलेली आहेत़ पैकी जिल्हा कामगार अधिकारी हे पद भरलेले आहे़मिनिमम वेजेस इन्स्पेक्टर पदाच्या सहा जागा गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत तर शॉप इन्स्पेक्टरचे एक पद डिसेंबर २०११ पासून रिक्त आहे़ क्लार्क पदाच्या दोन्ही जागा आॅगस्ट २०१२ पासून रिक्त आहेत़ शिपाई पदाच्या दोन जागा जून २०१४ पासून रिक्त आहेत़ अंबाजोगाईसाठी शॉप इन्स्पेक्टरचे एक पद, क्लार्कचे एक तर शिपायाचे एक पद अशी तीन पदे मंजूर आहेत़ तेथे गेल्या सहा महिन्यांपासून शिपायाचे पद रिक्त आहे़ त्यामुळे कार्यालयातील छोट्यातली छोटी कामेही शॉप इन्स्पेक्टर व क्लार्क यांनाच करावी लागतात़ बीड येथील कार्यालयाबबात असलेल्या रिक्त पदाबाबंत वरिष्ठांना कळविले आहे़ सूचना दिल्यानंतर रिक्त पदे भरू, असे कामगार अधिकारी युवराज पडियाल म्हणाले़ (प्रतिनिधी)