शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उत्साह पोलिसांचा अन् डोकेदुखी अन्न प्रशासनाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:56 IST

बीड : जिल्ह्यात गुटख्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई करताना पोलिसांकडून दाखवला जाणारा उत्साह आता अन्न प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात गुटख्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई करताना पोलिसांकडून दाखवला जाणारा उत्साह आता अन्न प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. गुटखा पकडल्यानंतर पोलिसांनी अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करणे गरजेचे असते. परंतु पोलीस तसे करीत नाहीत. न्यायालयाच्या नियमानुसार पोलिसांनी केवळ सहकार्याची भूमिका बजवावी. त्यांना गुटखा जप्त किंवा त्यावर कारवाईचे अधिकार नसल्याचे अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनात गुटखा पकडला होता. मात्र अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी गुटखा बाहेर काढून त्याचे फोटो काढले. माहितीनुसार पोलिसांची ही कृतीच कायद्याचा भंग करणारी आहे. नवीन अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्तीचे अधिकार अन्न प्रशासनाला आहेत. त्यामुळे जप्तीची कारवाई पूर्ण होण्यापूर्वी वाहनातून गुटखा बाहेर काढणे अपेक्षित नव्हते. पोलिसांच्या या कृतीमुळे गुटखा नेमका वाहनातच पकडला की इतरत्र कोठे पकडून वाहनात दाखवण्यात आला? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. नेकनूरच्या कारवाईत बाहेर काढलेला गुटखा हा जप्त केलेल्या वाहनात बसत नसल्याचा संशय खुद्द अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलीस संशयाच्या पिंजºयात अडकले आहेत.