शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेकच्या द्विशतकाने उस्मानाबाद भक्कम स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:32 IST

अभिषेक पवार याच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या बळावर उस्मानाबाद संघाने गुरुवारी नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत लातूरविरुद्ध आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या दिवसअखेर लातूर संघाने २९ धावांत ३ फलंदाज गमावले असून ते ३८७ धावांनी पिछाडीवर आहेत.

औरंगाबाद : अभिषेक पवार याच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या बळावर उस्मानाबाद संघाने गुरुवारी नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत लातूरविरुद्ध आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या दिवसअखेर लातूर संघाने २९ धावांत ३ फलंदाज गमावले असून ते ३८७ धावांनी पिछाडीवर आहेत.उस्मानाबादचा कर्णधार अभिषेक पवार याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमेश पाटील आणि यश लोमटे यांनी सलामीसाठी ४१ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर लौकिक सूर्यवंशी आणि यश लोमटे यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक पवारने चौफेर टोलेबाजी करताना लातूरच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याने अंकित गणेश याच्या साथीने ८८, गिरीश बोचरेला बरोबर घेत ९७ चेंडूंत आक्रमक ९४ धावांची भागीदारी केली. अभिषेकने सौरभ बिराजदार याच्या साथीने ४४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी करताना उस्मानाबादची स्थिती भक्कम केली. अभिषेक पवार याने त्याच्या आक्रमक खेळीत स्वरूप बैनगिरे याला २, तर आकाश आडे, कार्तिक गोविंदपूरकर आणि यश बारगे यांना प्रत्येकी १ असा मिडविकेट आणि लाँगआॅनच्या दिशेने असे एकूण ६ उत्तुंग षटकार ठोकले. त्याच्या या स्फोटक खेळीने उस्मानाबादने पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला. गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणाºया अभिषेक पवारने अर्धशतक ५१ चेंडूंत, शतक १०२ चेंडूंत, दीडशतक १३६ चेंडूंत आणि द्विशतक अवघ्या १७१ चेंडूंत फटकावले. अभिषेक पवारने उस्मानाबादतर्फे सर्वाधिक १७२ चेंडूंत २८ सनसनीत चौकार आणि ६ षटकारांसह २०३ धावांची खेळी सजवली. यश लोमटेने ११ चौकारांसह ८८ चेंडूंत ५०, अंकित गणेशने ३१, गिरीश बोचरे व लौकिक सूर्यवंशी यांनी प्रत्येकी २८, तर सौरभ बिराजदारने १९ व प्रथमेश पाटीलने १७ धावांचे योगदान दिले. लातूरकडून दौलत पाटील याने ५० धावांत ४ गडी बाद केले.प्रत्युत्तरात लातूरची सुरुवात खराब होऊन त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज २९ धावांत तंबूत परतले. उस्मानाबादकडून प्रथमेश पाटीलने २ व सौरभ बिराजदारने १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकउस्मानाबाद (पहिला डाव) : ८ बाद ४१६ धावा (घोषित) (अभिषेक पवार २०३, यश लोमटे ५०, अंकित गणेश ३१, लौकिक सूर्यवंशी २८, गिरीश बोचरे २८. दौलत पाटील ४/५०). लातूर : पहिला डाव ३ बाद २९. (प्रथमेश पाटील २/९, सौरभ बिराजदार १/०५).