शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगीसाठी गुगल मॅपचाही वापर

By admin | Updated: March 17, 2016 00:12 IST

अनुराग पोवळे, नांदेड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गुगल मॅपसह स्थळ पाहणी, विकास आराखड्याची प्रत आदी बाबी बांधकाम परवानगीसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

अनुराग पोवळे, नांदेड मनपाच्या बांधकाम परवानगी प्रक्रियेत सुसूत्रता आणताना ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गुगल मॅपसह स्थळ पाहणी, विकास आराखड्याची प्रत आदी बाबी बांधकाम परवानगीसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.शहरात २०१५-१६ मध्ये १२७९ बांधकाम परवानगीसाठी संचिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ९३९ संचिकांना परवानगी देण्यात आली आहे. ही बांधकाम परवानगी प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी आयुक्त सुशील खोडवेकर यांनी स्वत: नियमावली तयार केली. त्यासह चक्क गुगल मॅपचा वापरही केला जात आहे. गुगल मॅपद्वारे बांधकाम परवानगीसाठी आलेल्या जागा दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्थळ पाहणे, मालमत्ताधारकांचा रिकाम्या जागेवरील फोटोही बंधनकारक करण्यात आला आहे. शहरातील १०० मान्यताप्राप्त आर्कीटेक्टद्वारे बांधकाम परवानगीच्या संचिका स्वीकारल्या जात आहेत. या संचिका स्वीकारताना मालमत्ताधारकांचे पीआर कार्ड, मालकी हक्काचे इतर कागदपत्रे हेही तपासले जात आहेत. मध्यंतरी काही ठिकाणी बांधकाम निम्मे किंवा त्याहून अधिक झाल्यानंतर बांधकाम परवानगीचे संचिका दाखल करण्यात आली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्त खोडवेकर यांनी २७ आर्कीटेक्टचे लॉगीन बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले. दरम्यान, महापालिकेला नगररचना विभागाकडून १ एप्रिल २०१५ ते १० मार्च २०१६ या कालावधीत १३ कोटी ३९ लाख ९२९६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एलबीटीची रक्कम ही ७९ लाख २० हजार ९१५ रुपये, विकास शुल्क (बांधकम), २ कोटी ५० लाख, ११ हजार ५७० रुपये आदी बाबीतून ही रक्कम प्राप्त झाली आहे. नगररचना विभागाकडून बांधकाम परवानासह इतर कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावी यासाठी आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असल्याचे नगररचना विभागाचे अधिकारी खुशाल कदम यांनी सांगितले. हार्डशिप प्रिमियम- मनपाच्या नव्या उत्पन्नाचे स्त्रोतमनपाने २०१४-१५ पासून बांधकामासाठी सुरू केलेले हार्डशिप प्रिमियम हे धोरण मनपासाठी उत्पन्नाचे नवे आर्थिक स्त्रोत बनले आहे. पहिल्यावर्षी ५ कोटी ३८ लाख तर यावर्षी ५ कोटी ९ लाखांचे उत्पन्न झाले आहेत. हार्डशिपमध्ये दंडनीय रक्कम आकारुन बांधकाम नियमित केले जाते.नांदेड महापालिकेने २०१४-१५ मध्ये सुरू केलेले हार्डशिप प्रिमियम धोरण विद्यमान सरकारने अवैध बांधकाम नियमित करण्यासाठी अवलंबिले असल्याची बाबही पुढे आली आहे. या बाबीस अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी नांदेड पॅटर्न नुसारच राज्यात अनधिकृत बांधकामांना नियमित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.